NZ W vs SL W, 2024 ICC Women's T20 World Cup Preview: श्रीलंका न्यूझीलंड आज आमनेसामने; हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहाल, जाणून घ्या

हा सामना 12 ऑक्टोबर रोजी शनिवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 03:30 वाजता खेळला जाईल.

Photo Credit- X

New Zealand Women's National Cricket Team vs Sri Lanka Women's National Cricket Team Preview: न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध श्रीलंका महिला क्रिकेट संघात आज 12 ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सामना होणर आहे. न्यूझीलंडने त्यांचा शेवटचा सामना 60 धावांनी गमावल्याने त्यांचा नेट रन रेट -0.050 झाला. दरम्यान, श्रीलंकेला त्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे विश्वचषकातून बाहेर पडावे लागणार आहे. आशिया चषक विजेते संघाने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत, ज्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे. दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला टी20 विश्वचषक सामन्याच्या सर्व तपशीलांसाठी खाली दिले आहेत.

न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड : न्यूझीलंडचे श्रीलंकेविरुद्ध हेड टू हेड रेकॉर्डवर वर्चस्व आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 13 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने केवळ एकच सामना जिंकला आहे. या 13 सामन्यांपैकी पाच टी 20 विश्वचषक स्पर्धेत झाले, ज्यात न्यूझीलंडने सर्व सामने जिंकले.

न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघचे प्रमुख खेळाडू: सुझी बेट्स, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन, चामरी अथापथु, हर्षिता समरविक्रमा, उदेशिका प्रबोधिनी हे काही खेळाडू आहेत ज्यांना सामन्याचा मार्ग कसा बदलायचा हे माहित आहे.

मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू: न्यूझीलंडची महिला स्टार बॅट्समन सुझी बेट्स विरुद्ध श्रीलंकेची गोलंदाज उदेशिका प्रबोधिनी यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. त्याचवेळी सोफी डिव्हाईन विरुद्ध चमारी अथापथु यांच्यातील संघर्षाचाही या सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. दोन्ही संघांमध्ये अनेक प्रभावी युवा खेळाडूंसह संतुलित फळी आहे.

सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला क्रिकेट संघ 2024 आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 15 वा सामना 12 ऑक्टोबर (शनिवार) रोजी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 03:30 वाजता खेळला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 03:00 वाजता होईल.

 सामन्याचे टेलिकास्ट किंवा स्ट्रीमिंग कोठे आणि कसे पहावे?

आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 सामन्याचे अधिकृत आणि थेट प्रक्षेपण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. विश्वचषक सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. दुसरीकडे, त्यांच्या अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar ॲपवर सामन्याचे स्ट्रीमिंग केले जाईल. जेथे लोक मोबाइल, टॅब, स्मार्ट टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहतील.

दोन्ही संघांचे खेळाडू

न्यूझीलंड संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, ईडन कार्सन.

श्रीलंका संघ: विशामी गुणरत्ने, चामरी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, नीलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, उदेशिका प्रबोधिनी, इनोशी.