Sri Lanka vs West Indies, 3rd T20I 1st Inning Scorecare: वेस्ट इंडिजचं श्रीलंकेसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य; महेश थेक्षना, वानिंदू हसरंगा यांची दमदार कामगिरी
दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेच्या संघाने वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
Sri Lanka vs West Indies, 3rd T20I 1st Inning Scorecare: श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (Sri Lanka vs West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील 2024 मधील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेच्या संघाने वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं श्रीलंकेसमोर विजयासाठी 163 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या मालिकेत चरिथ असलंका यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघा मैदानात उतरला आहे. तर, वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना होणार आहे.
दरम्यान, मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या पाच धावांच्या स्कोअरवर संघाला पहिला मोठा धक्का बसला.
सामन्याच्या पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड:
वेस्ट इंडिज संघाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 163 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोव्हमन पॉवेलने 37 धावांची शानदार खेळी केली. रोव्हमन पॉवेलशिवाय गुडाकेश मोतीने 32 धावा केल्या.
महेश थेक्षनाने श्रीलंकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. श्रीलंकेकडून महेश थेक्षाना आणि वानिंदू हसरंगा यांनी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. महेश थेक्षाना आणि वानिंदू हसरंगा यांच्याशिवाय नुवान तुषारा, कामिंदू मेंडिस, कर्णधार चारिथ असलंका आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 20 षटकांत 164 धावा करायच्या आहेत. तिसरा टी 20 सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका जिंकायची आहे.