Sri Lanka Beat West Indies: श्रीलंकेचा वेस्ट इंडिजवर 5 विकेटने शानदार विजय, चारिथ असलंकाची कॅप्टन इनिंग्स

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 45 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर सलामीवीर निशान मदुष्का आणि कर्णधार चारिथ असलंका यांनी मिळून डाव सांभाळला.

Sri Lanka Beat West Indies: श्रीलंकेचा वेस्ट इंडिजवर 5 विकेटने शानदार विजय, चारिथ असलंकाची कॅप्टन इनिंग्स
श्रीलंका (Photo Credits: Sri Lank Cricket Board/Twitter)

Sri Lanka National Cricket Team vs West Indies National Cricket Team, 1st ODI Match 2024 Scorecard:  श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series)  पहिला सामना आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पल्लेकेले (Pallekele) येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर  (Pallekele International Cricket Stadium) खेळला जात आहे. या मालिकेत चरिथ असलंका (Charith Asalanka)  श्रीलंकेचे (Sri Lanka) नेतृत्व करत आहे. वेस्ट इंडिजची (West Indies)  कमान शाई होपच्या (Shai Hope)  खांद्यावर आहे.  (हेही वाचा  -  New Zealand Women Beat South Africa Women, Final Match Scorecard: अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून न्यूझीलंड बनला T20 वर्ल्ड चॅम्पियन, अमेलिया केरची अष्टपैलू खेळी )

पाहा स्कोअरकार्ड

वेस्ट इंडिज संघाने 37 षटकात 4 गडी गमावून 185 धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी शेरफेन रदरफोर्डने नाबाद 74 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान शेरफेन रदरफोर्डने 82 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकार ठोकले. शेरफेन रदरफोर्डशिवाय केसी कार्टीने 37 धावा केल्या.

वानिंदू हसरंगाने श्रीलंकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक दोन बळी घेतले. वानिंदू हसरंगाशिवाय जेफ्री वांडरसे आणि चरिथ असलंका यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. डीएलएसच्या नियमांनुसार हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 37 षटकात 232 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 45 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर सलामीवीर निशान मदुष्का आणि कर्णधार चारिथ असलंका यांनी मिळून डाव सांभाळला. श्रीलंकेच्या संघाने अवघ्या 31.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. श्रीलंकेसाठी चरित असलंकाने सर्वाधिक 77 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान चरित असलंकाने 71 चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. चारिथ असलंकाशिवाय निशान मदुष्काने 69 धावा केल्या.

अल्झारी जोसेफने वेस्ट इंडिज संघाला पहिले यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक तीन बळी घेतले. गुडाकेश मोतीशिवाय अल्झारी जोसेफने दोन गडी बाद केले. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी अडीच वाजल्यापासून खेळवला जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2024 12:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).