Southampton Weather Update for June 22: भारत-न्यूझीलंड चाहत्यांच्या उत्साहावर पुन्हा पावसाचे पाणी? पाहा काय सांगतो पाचव्या दिवसाच्या हवामानाचा अंदाज
भारत आणि इंन्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपप फायनलचा चौथा दिवस सोमवारी संततधार पाऊस पडल्यामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला. AccuWeather वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिवसभर हलक्या पावसाचा अंदाज वर्तवाल जात आहे. 22 जून रोजी साऊथॅम्प्टनमधील हवामान पुन्हा ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
IND vs NZ WTC Final June 22 Weather Forecast: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलचा चौथा दिवस सोमवारी संततधार पाऊस पडल्यामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला. तिसऱ्या दिवशी देखील पावसाचा खेळ सुरु असल्यामुळे सामन्याच्या सुरुवातीला विलंब झाला शिवाय खराब प्रकाशामुळे देखील सामना वेळेपूर्वीच संपुष्टात आणला गेले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडची स्थिती 2 बाद 101 अशी झाली होती. पाचव्या दिवसाचा खेळ विजयी संघाच्या निर्णयासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. पावसामुळे यापूर्वी पहिला दिवस देखील धुवून गेला होता त्यामुळे आता 23 जून, राखीव दिवशी देखील सामना रंगणार आहे. त्यामुळे अखेरच्या दोन दिवसाचा खेळ शिल्लक असल्यामुळे पाचव्या दिवसाच्या हवामानाचा अंदाज जाणून घेणार आहोत. (IND vs NZ WTC Final 2021: इंग्लंडमध्ये Ishant Sharma याचा डंका, विकेट घेताच केले 2 मोठे कीर्तिमान)
AccuWeather वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिवसभर हलक्या पावसाचा अंदाज वर्तवाल जात आहे ज्यामुळे पहिल्या दोन अवधीच्या तुलनेत खेळाची शक्यता कमी आहे. 22 जून रोजी साऊथॅम्प्टनमधील (Southampton) हवामान पुन्हा ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 5 व्या दिवशी पुन्हा पाऊस चाहत्यांच्या उठसवर पाणी फेडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, जर सामना पुन्हा सुरू झाला तर केन विल्यमसन आणि रॉस टेलरच्या अनुभवी जोडीला लवकरात लवकर बाद करण्यात वेगवान गोलंदाज महत्वाची भूमिका बजावतील. दरम्यान, सामना बरोबरीत किंवा अनिर्णित राहिल्यास आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
साउथॅम्प्टनमध्ये वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिल्ने अपेक्षित आहे कारण ढग त्यांना चेंडू स्विंग करून देण्यास मदत करतील. तसेच न्यूझीलंडचे फलंदाजांनी आपला वेळ काढून सावधगिरीने खेळण्याचा विचार करत असतील. भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांच्यासारखे जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. तथापि तिसऱ्या दिवशी चेंडू स्विंग करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे आता बहुचर्चित सामन्याचा काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)