दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ फलंदाजाने AB De Villiers वर लगावले गंभीर आरोप, येथे वाचा संपूर्ण प्रकरण

वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा नंतर आता फलंदाज खाया झोंडोने डिव्हिलियर्सवर गंभीर आरोप केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू खाया झोंडोने खुलासा केला आहे की, त्याने 2015 मध्ये भारत दौऱ्यावर कर्णधार असताना एबी डिव्हिलियर्स बद्दलचा आदर गमावला.

एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: Facebook)

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सवर (AB de Villiers) त्याच्याच संघातील काही खेळाडूंनी भेदभाव केल्याचा आरोप लगावला आहे. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा नंतर आता फलंदाज खाया झोंडोने (Khaya Zondo) डिव्हिलियर्सवर गंभीर आरोप केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू खाया झोंडोने खुलासा केला आहे की, त्याने 2015 मध्ये भारत दौऱ्यावर (India Tour) कर्णधार असताना एबी डिव्हिलियर्स बद्दलचा आदर गमावला ज्यामध्ये त्याला मुंबईतील एकदिवसीय सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची निवड होऊ दिली नाही आणि डीन एल्गरचा (Dean Elgar) समावेश केला. दक्षिण आफ्रिकेचे सामाजिक न्याय आणि राष्ट्र भवनात सुनावणी दरम्यान माजी निवडकर्ता हुसेन मानेक यांनी साक्ष दिली होती की 2015 भारत दौऱ्यात झोंडोला दक्षिण आफ्रिकेसाठी खेळण्यापासून रोखण्यात डिव्हिलियर्सची भूमिका होती.

त्याने असेही आरोप केले की संघाचा भाग असूनही त्याच्या जागी डीन एल्गरला स्थान देण्यात आले जो सुरुवातीच्या संघाचा भाग नव्हता आणि दक्षिण आफ्रिकन संघातून त्याला बाहेर काढण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनी भारताविरुद्ध त्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात जखमी झाला होता आणि त्यानंतर ड्युमिनीच्या जागी खाया झोंडो पदार्पण करणार होता. पण संघ व्यवस्थापनाने झोंडोऐवजी डीन एल्गरला संधी दिली. या घटनेनंतर जोंडो म्हणाला की त्याने डिव्हिलियर्स बद्दलचा आदरही गमावला. झोंडो हा भारत दौऱ्याचा भाग होता आणि मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्यानंतर निर्णायक सामन्यातून त्याला बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर डीन एल्गर कसोटी संघाचा भाग बनण्यासाठी दौऱ्यावर आला पण त्याने सलग मालिका खेळली. अहवालानुसार, संघ व्यवस्थापनाला कर्णधार डिव्हिलियर्सने धमकी दिली होती की जर झोंडो खेळला तर तो भारत दौरा मध्यभागी सोडून मायदेशी रवाना होईल. यापूर्वी, डिव्हिलियर्सवर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने वांशिक आधारावर भेदभाव केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, एबी डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेसाठी त्याने 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान, डिव्हिलियर्सने कसोटीत 8765 धावा, वनडेमध्ये 9577 धावा आणि टी-20 मध्ये 1672 धावा केल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डिव्हिलियर्सचा समावेश आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif