
SA vs AUS WTC Final Day 1: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs SA) यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आहे, गेल्या आवृत्तीत त्यांनी भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहे. तर, दक्षिण आफ्रिकेची कमान टेम्बा बावुमाकडे आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 212 धावात गारद झाला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या 5 विकेट्स आणि मार्को जॅन्सेनच्या 3 विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 212 धावांवर संपुष्टात आला.
Rabada and Jansen shine as South Africa make the toss count 👏
🔗 https://t.co/u1ZgBoPw7F | #WTCFinal pic.twitter.com/OahSaYANmu
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 11, 2025
ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ (66 धावा, 112 चेंडू, 10 चौकार) आणि ब्यू वेबस्टर (72 धावा, 92 चेंडू, 11 चौकार) हे एकमेव फलंदाज होते जे आफ्रिकन आक्रमणाविरुद्ध खंबीरपणे उभे राहिले आणि धावा काढल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणताही फलंदाज मोठा खेळ करू शकला नाही. अॅलेक्स कॅरीनेही 23 धावांचे योगदान दिले. पॉवरप्लेमध्येच उस्मान ख्वाजा (0) आणि कॅमेरॉन ग्रीन (4) बाद झाल्यावर संघाची सुरुवात खूपच खराब झाली. लाबुशेन (17) आणि ट्रॅव्हिस हेड (11) यांनाही मोठी खेळी करता आली नाही. स्मिथ आणि वेबस्टर यांनी पाचव्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी करून संघाला काहीसा दिलासा दिला.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांनी शानदार कामगिरी केली आणि 15.4 षटकांत 51 धावांत 5 बळी घेतले. त्याने ख्वाजा, ग्रीन, वेबस्टर, स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याच वेळी, मार्को जॅन्सनने 14 षटकांत 49 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय केशव महाराजने अॅलेक्स कॅरीला बाद केले तर एडेन मार्करामने स्टीव्ह स्मिथची महत्त्वाची विकेट घेतली. पहिल्या डावात 212 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला पुन्हा फलंदाजी करावी लागली.