‘Sourav Ganguly याला कर्णधार म्हणून परिश्रम नाही तर फक्त नियंत्रण मिळवायचे होते,’ माजी प्रशिक्षक Greg Chappell यांचा मोठा आरोप

2005 मध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गजाला प्रशिक्षक म्हणून संघात स्थान देणाऱ्या माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल ग्रेग चॅपल यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावे केले आहेत. गांगुलीला खेळाडू म्हणून त्याच्या खेळावर कठोर परिश्रम करणे आवडत नव्हते आणि फक्त कर्णधार म्हणूनच संघात रहायचे होते, असा आरोप करत चॅपेल यांनी भारतीय संघासोबतच्या दोन वर्षांच्या विवादास्पद कार्यकाळाची माहिती दिली.

ग्रेग चॅपल आणि सौरव गांगुली (Photo Credit: Wikimedia Commons, Facebook)

Greg Chappell Accuses Sourav Ganguly: भारतीय संघाचे (Indian Team) माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल (Greg Chappell) आणि कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील वाद अद्याप संपलेला दिसत नाही आहे. 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गजाला प्रशिक्षक म्हणून संघात स्थान देणाऱ्या गांगुलीबद्दल चॅपल यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावे केले आहेत. गांगुलीला खेळाडू म्हणून त्याच्या खेळावर कठोर परिश्रम करणे आवडत नव्हते आणि फक्त कर्णधार म्हणूनच संघात रहायचे होते, असा आरोप करत चॅपेल यांनी भारतीय संघासोबतच्या दोन वर्षांच्या विवादास्पद कार्यकाळाची माहिती दिली. गांगुलीशी चॅपेलचे समीकरण इतके वाढले की त्याला भारतीय संघातून (Indian Team) स्थान गमवावे लागले आणि राहुल द्रविडला (Rahul Dravid) कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. विशेष म्हणजे, बीसीसीआयने (BCCI) चॅपेल यांना प्रशिक्षकपदावर मिळवून देण्यात गांगुलीची मोठी भूमिका राहिली होती. (Sourav Ganguly On Being Dropped: 'फक्त ग्रेग चॅपेलला दोष देऊ शकत नाही', 15 वर्षानंतर सौरव गांगुली यांनी भारतीय संघातून वगळण्याबाबत केला धक्कादायक खुलासा)

“गांगुलीनेच मला कोचिंगसाठी संपर्क साधला. माझ्याकडे इतर ऑफर होते पण मी ठरविले की जॉन बुचनन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षण करत असल्याने मला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या, कट्टर क्रिकेटच्या देशाचे प्रशिक्षकपद आवडेल आणि ही संधी मला मिळाली कारण कर्णधार असलेल्या सौरवने मला याची खात्री करुन दिली. भारतातील दोन वर्षे प्रत्येक स्तरावर आव्हानात्मक होती. अपेक्षा हास्यास्पद होत्या. सौरवचा कर्णधार होण्यामागे काही मुद्दे होते. त्याला विशेषतः कठोर परिश्रम करण्याची इच्छा नव्हती. त्याला आपले क्रिकेट सुधारण्याची इच्छा नव्हती. त्याला फक्त संघात कर्णधार म्हणून रहायचे होते जेणेकरुन त्याने गोष्टींवर नियंत्रण राहील,” Cricket Life Stories पोडकास्टवर चॅपेल म्हणाले.

त्यानंतर चॅपेल यांनी सांगितले की, भारतीय प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडायची होती. ते म्हणाले की मला काही परंपरा आणि संघात विचार करण्याची पद्धत बदलू इच्छित होते. ते म्हणाले की, राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने जवळपास एक वर्ष चांगले कामगिरी बजावली, परंतु त्यानंतर गोष्टी बिघडू लागल्या. “द्रविडने खरोखर जगातील सर्वोत्तम संघ म्हणून भारतात गुंतवणूक केली होती. दुर्दैवाने संघातील प्रत्येकाची भावना सारखीच नव्हती. त्याऐवजी ते संघात राहण्यावर लक्ष केंद्रित करत होते. ज्येष्ठ खेळाडूंपैकी काहींचा प्रतिकार होता, कारण त्यांच्यातील काहींच्या कारकीर्दीचा शेवट जवळ आला होता. जेव्हा सौरव संघातून वगळले गेले, तेव्हा आमच्याकडे खेळाडूंकडे खूप लक्ष होते, कारण जर तो बाहेर जाऊ शकतो तर कुणालाही जाता येईल हे त्यांना कळून चुकलं होतं.”

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now