SL vs NZ 1st Test: टीम साउथी याने साधली सचिन तेंडुलकर याच्या अनोख्या विक्रमाची बरोबरी, वाचा सविस्तर

साऊथीने 1 षटकार मारत त्याच्या षटकारांची संख्या 69 केली. तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय टेस्ट करिअरमध्ये इतकेच षटकार मारले आहेत. सचिनने 200 टेस्ट सामन्यांमध्ये 69 षटकार ठोकले तर साऊथी सध्या 66 वा सामना खेळत आहे.

न्यूझीलंड क्रिकेट (Photo: AP/PTI)

क्रिकेट जगातील कोणत्याही देशाचा क्रिकेटपटू असो, प्रत्येकाला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा एक रेकॉर्ड तरी मोडण्याची इच्छा असते. भारताचा माजी महान फलंदाज तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत क्रिकेटमध्ये अनेक विरामांची नोंद केली आहे. सध्या एकमेव विराट कोहली त्याचे विक्रम मोडण्याच्या प्रयत्नात आहे, इतर कोणताही खेळाडू त्याच्या आजूबाजूला दिसत नाहीत. त्याचवेळी गुरुवारी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाने तेंडुलकरच्या फलंदाजीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल, पण टीम साऊथी (Tim Southee) याने ते करून दाखवून दिले. श्रीलंका विरुद्ध सध्या सुरु असलेल्या टेस्ट मालिकेत साऊथीने एक षटकार मारत तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. (SL vs NZ 1st Test: पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ट्रेंट बोल्ट याने स्वतःला केले झेलबाद, जाणून घ्या कसे)

श्रीलंका (Sri Lanka) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात सुरु असलेल्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेस्ट मालिकेत गॅलेमध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज साऊथीने 1 षटकार मारत त्याच्या षटकारांची संख्या 69 केली. तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय टेस्ट करिअरमध्ये इतकेच षटकार मारले आहेत. सचिनने 200 टेस्ट सामन्यांमध्ये 69 षटकार ठोकले तर साऊथी सध्या 66 वा सामना खेळत आहे. तेही जेव्हा त्याने आपल्या कारकीर्दीतील बहुतेक सामन्यांमध्ये 8 व्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

साऊथीने सचिनची बरोबरी केली आहे आणि आता हे देखील शक्य आहे की तो सचिनला न केवळ मागे टाकेल तर या प्रकरणात त्याच्यापुढील काही दिग्गजांना देखील देखील पिछाडीवर टाकण्याचा प्रयत्न करेल. टेस्ट क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांच्या यादीत साऊथी सध्या 17 व्या स्थानावर आहे. तर अव्वल क्रमांकावर त्याच्याच देशाचा आणि माजी कर्णधार ब्रेंडन मैकुलम (Brendon McCullum) आहे. मैकुलमने टेस्ट सामन्यात 107 षटकार मारले आहेत. शिवाय, याच्यासह आता साऊथी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्या 73 षटकारांच्या जवळ आला आहे.



संबंधित बातम्या

WTC 2025 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया कुठे आहे, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रवेश, पहा ताजे अपडेट

Australia vs India, 4th Test Day 5 Preview: पाचव्या दिवशी भारतीय फलंदाज इतिहास रचतील की ऑस्ट्रेलियन गोलंदाज कहर करतील, पाचव्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती घ्या जाणून

New Zealand vs Sri Lanka, T20I Stats: T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी, पहा दोन्ही संघांची महत्त्वाची आकडेवारी

ICC WTC 2025 Final: दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, टीम इंडिया अशी मिळवू शकते पात्रता