लग्नापुर्वीच ‘हे’ 5 स्टार क्रिकेटपटू बनले बापमाणूस, 2 भारतीय तर ‘या’ दिग्गज खेळाडूंचा देखील यादीत समावेश

प्रेम आणि अतिरिक्त जबाबदारीने भरलेली ही एक सुंदर भावना असते. क्रिकेट जगतात अशी अनेक नावे आहेत, जे लग्नाआधी बाप झाले आहेत. बदलत्या काळाबरोबर, खेळ आणि खेळाडू दोघेही आधुनिक झाले आहेत आणि उघडपणे त्यांनी नातं स्वीकारले आहे. लग्नापूर्वीच बापमाणूस बनलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची नावे खालीलप्रमाणे आहेत.

जो रूट आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: Instagram)

जगभरातील क्रिकेटपटू मैदानावरील आपल्या खेळासाठी जेवढे प्रसिद्ध असतात ते लग्न किंवा प्रेमसंबंध किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतात. शिवाय त्यांच्याशी संबंधित प्रत्येक बातमी हेडलाईन बनतात. पालक होणे ही एखाद्याच्या जीवनातील एक महत्त्वाची बाब असते. प्रेम आणि अतिरिक्त जबाबदारीने भरलेली ही एक सुंदर भावना असते. क्रिकेट जगतात अशी अनेक नावे आहेत, जे लग्नाआधी बाप झाले आहेत. बदलत्या काळाबरोबर, खेळ आणि खेळाडू दोघेही आधुनिक झाले आहेत आणि उघडपणे त्यांनी नातं स्वीकारले आहे. लग्नापूर्वीच बापमाणूस बनलेल्या (Cricketers Become Father Before Marriage) आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2021: मनीष पांडेमुळे गेले David Warner याचे कर्णधारपद? SRH कर्णधारपदाच्या चर्चेत Simon Doull यांनी केलं धक्कादायक विधान)

1. सर विव रिचर्ड्स (Sir Viv Richards)

सर विवियन रिचर्ड्स आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ताची प्रेमकथा खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी लग्नाशिवाय गोड बातमी दिली. या जोडप्याने बराच काळ एकमेकांना डेट केले. यादरम्यान गुप्ता यांनी एका मुलीलाही जन्म दिला, मसाबा गुप्ता, जी आज देशातील आघाडीच्या फॅशन डिझायनर्सपैकी एक आहे.

2. जो रूट (Joe Root)

इंग्लंडचा हुशार फलंदाज आणि कर्णधार जो रूट लग्नाआधीच बाप बनला होता. 2017 मध्ये त्याच्या मुलाचा जन्म झाला त्यानंतर त्याने 2018 मध्ये आपली मैत्रीण कॅरी कॉटरलसोबत विवाहबंधनात अडकला. गेल्या वर्षी जो रूट पुन्हा एकदा बाप बनला आहे. जुलै महिन्यात त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला.

3. विनोद कांबळी (Vinod Kambli)

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जवळचा मित्र विनोद कांबळी देखील या यादीत सामील आहे. नोएला लेविसशी घटस्फोटानंतर कांबळीचे अफेअर फॅशन मॉडल आंद्रेया हॅविटसोबत चालू होते. यादरम्यान आंद्रेयाला मुलगा झाला म्हणून लगेच त्यांनी लग्न केले. त्यांच्या मुलाचे नाव जीजस क्रिस्टियानो आहे.

4. डेविड वॉर्नर (David Warner)

2015 मध्ये प्रसिद्ध मॉडेल कँडिस फाल्जनशी लग्न करण्यापूर्वी वॉर्नरला पहिले कन्यारत्न प्राप्त झाले होते. 2014 मध्ये, कँडिसने Ivy वॉर्नरला जन्म दिला.

5. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

टीम इंडियाचा तडाखेबाज अष्टपैलू हार्दिक पांड्याने मागील वर्षी पत्नी नताशा स्टेनकोव्हिकचे प्रेगनंट असल्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत खुशखबर शेअर केली. त्यांनतर पांड्याने त्यांच्या पारंपरिक विवाह सोहळ्यातील आणखी काही फोटोही शेअर केले. जानेवारी 2020 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.