Jos Buttler on Shubman Gill: शुभमन गिल कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा मिश्रण- जोस बटलर

भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिल हा कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा मिश्रण असल्याचा विश्वास जोस बटलरने व्यक्त केला आहे. शुक्रवारपासून भारत इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.

Jos Buttler on Shubman Gill: शुभमन गिल कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा मिश्रण- जोस बटलर
Photo Credit- X

Jos Buttler on Shubman Gill: इंग्लंडचा माजी कर्णधार जोस बटलर या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळला. शुभमन गिलच्या नेतृत्वाचा अनुभव आल्यानंतर जोस बटलर म्हणाला की त्याला कर्णधारपदाची भूमिका आणि त्याची फलंदाजी संतुलित करावी लागेल. जोस बटलरने स्टुअर्ट ब्रॉडसोबत 'फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट' या पॉडकास्टमध्ये म्हणाले की, "तो खरोखरच एक प्रभावी खेळाडू आहे. तो बोलतो तेव्हा तो खूप शांत आणि संतुलित असतो. मला वाटते की तो मैदानावर स्वतःला आव्हान देतो. त्याच्यात खूप जोश आहे. मला वाटते की तो कर्णधार म्हणून कोहली आणि रोहितचे मिश्रण आहे."

जोस बटलर पुढे म्हणाला की, "कोहली खरोखरच खूप आक्रमक होता. त्याने भारतीय संघ पूर्णपणे बदलून टाकला. त्याने सामन्यासाठी तयारी केली. रोहित थोडा वेगळा होता. थोडा शांत आणि संयमी होता. पण त्याच्यात लढण्याची उत्तम कला होती." बटलर म्हणाला, "गिलने दोघांकडून खूप काही शिकले आहे पण तो मैदानावर पूर्णपणे वेगळा दिसेल." बटलर म्हणाला की कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणे म्हणजे देशातील 'तिसरा किंवा चौथा सर्वात प्रभावशाली व्यक्ती' असल्यासारखे आहे.

जोस बटलर पुढे म्हणाला की, "शुभमन गिलने फलंदाज आणि कर्णधाराची भूमीका वेगळी करावी. जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा तो फक्त फलंदाज रहायला हवा. यानंतर तो त्याच्या कर्णधारपदाच्या कौशल्यांवर काम करेल आणि दोन्ही भूमिका वेगळ्या पद्धतीने बजावण्याचा प्रयत्न करेल."

बटलर म्हणाला की, "मला वाटत नाही की आपण या लोकांच्या स्टारडमची पातळी समजू शकतो. तुम्हाला ते आयपीएलमध्ये दिसते. मला वाटते की भारतीय कसोटी कर्णधार हा पंतप्रधानांनंतर भारतातील तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. म्हणून, ही एक खूप महत्त्वाची जबाबदारी आहे."

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2025 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).