Shubman Gill New Record: एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलने केला मोठा पराक्रम, बाबरनंतर 'या' पाकिस्तानच्या दिग्गजाचा मोडला विक्रम

या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 85 धावांची खेळी खेळली. या सामन्यात त्याचे शतक हुकले तरीही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

Shubman Gill (Photo Credit - Twitter)

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने 200 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह भारताने मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 85 धावांची खेळी खेळली. या सामन्यात त्याचे शतक हुकले तरीही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. शुभमन गिलने या सामन्यात 85 धावांची दमदार खेळी केल्यानंतर आता वनडे फॉरमॅटमध्ये 27 डावांनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

पाकिस्तानच्या 'या' दिग्गजाचा मोडला विक्रम

यापूर्वी हा विक्रम पाकिस्तान क्रिकेट संघाचा सध्याचा डावखुरा सलामीवीर इमाम-उल-हकच्या नावावर होता, ज्याने 27 डावांत 1381 धावा केल्या होत्या. त्याचवेळी शुभमन गिलने अनेक डाव खेळल्यानंतर आता 1437 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 62.48 आहे. यापूर्वी त्याने बाबर आझमचा 26 डावांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला होता. (हे देखील वाचा: IND vs IRE T20 2023: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 10 महिन्यांनंतर बुमराहचे पुनरागमन; करणार संघाचे नेतृत्व)

गिलने इशान किशनसोबत 143 धावांची केली भागीदारी

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके झळकावली. ज्यामध्ये शुभमन गिलने 85 तर इशान किशनने 77 धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून 143 धावांची भागीदारी केली. यानंतर संजू सॅमसन (51) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (70*) यांनी शानदार खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.