IND vs AUS: शुभमन गिलने शतक झळकावून इतिहास रचला, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला मागे टाकत केला अनोखा विश्वविक्रम

यावेळी शुभमन गिलने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार फलंदाज हाशिम आमला, विराट कोहली आणि बाबर आझम यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत विश्वविक्रम केला आहे.

Shubman Gill (Photo Credit - Twitter)

आज इंदूरमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना 5 विकेटने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी वनडे जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेण्याची संधी आहे. या सामन्यात केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आज खेळत नाही. कमिन्सच्या जागी जोस हेझलवूडचा समावेश आहे. टीम इंडियाकडून, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आजच्या सामन्याचा भाग नाही.

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावून आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यावेळी शुभमन गिलने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार फलंदाज हाशिम आमला, विराट कोहली आणि बाबर आझम यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत विश्वविक्रम केला आहे.

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत 97 चेंडूत 104 धावा केल्या. यादरम्यान शुभमन गिलच्या बॅटमधून 6 चौकार आणि 4 षटकार आले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शुभमन गिलचे हे सहावे शतक आहे. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच शतक झळकावले आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात शुभमन गिल 35 डावात 1900 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. शुभमन गिलने या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला, पाकिस्तानचा बाबर आझम, फखर जमान, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे. (हे देखील वाचा: SuryaKumar Yadav New Record: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला सूर्या, आपल्या स्फोटक फलंदाजीने केला 'हा' मोठा विक्रम)

वनडेच्या 35 डावात सर्वाधिक धावा

शुभमन गिल- 1917 धावा

हाशिम आमला- 1844 धावा

बाबर आझम- 1758 धावा

रॅसी व्हॅन डर डुसेन- 1679 धावा

फखर जमान- 1642 धावा

शुभमन गिलने या वर्षातील झळकावले पाचवे शतक 

टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलचे यंदाचे पाचवे शतक आहे. एका कॅलेंडर वर्षात पाच किंवा त्याहून अधिक शतके करणारा शुभमन गिल हा सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. शुभमन गिलच्या आधी विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि शिखर धवन यांनी ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने हा पराक्रम चारवेळा केला आहे, तर रोहित शर्माने तीनदा केला आहे. सचिन तेंडुलकरनेही हा अनोखा पराक्रम दोनदा केला आहे.