Test Cricket: ‘या’ भारतीय धुरंधर खेळाडूंनी क्रिकेटला म्हटले पाहिजे ‘गुडबाय’, आता कदाचित टीम इंडियात पुनरागमन कठीण
Indian Test Cricket Team: भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही काळात युवा खेळाडूंची प्रचंड ताकद वाढली आहे. कसोटी संघांमध्ये नवीन प्रतिभावान खेळाडूंच्या उदयामुळे काही ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला पाहिजे कारण त्यांचे भारतीय ताफ्यात पुनरागमन होण्याची शक्यता फारच कमी आहे.
Indian Test Cricket Team: गेल्या काही काळात भारतीय क्रिकेटमध्ये (Indian Cricket) युवा खेळाडूंची प्रचंड ताकद वाढली आहे. शुबमन गिल, अक्षर पटेल (Axar Patel), मोहम्मद सिराज आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांसारख्या युवा प्रतिभावान खेळाडूंनी कसोटी मालिकेत बलाढ्य संघाचा त्यांच्याच भूमीवर पराभव करून संघात आपली दावेदारी मजबूत केली आहे. कसोटी संघांमध्ये अशा नवीन प्रतिभावान खेळाडूंच्या उदयामुळे काही ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला पाहिजे कारण त्यांचे भारतीय ताफ्यात पुनरागमन होण्याची शक्यता फारच कमी आहे. आज आपण अशाच पाच भारतीय क्रिकेटपटूंबाबत जाणून घेणार आहोत ज्यांचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन जवळजवळ अशक्य आहे आणि त्यांनी निवृत्तीचा विचार केला पाहिजे.
रिद्धिमान साहा
पहिले एमएस धोनी आणि गेल्या काही वर्षात रिषभ पंत यांच्या कसोटी संघात जोरदार कामगिरीमुळे बंगालचा ऋध्दिमान साहा भारतीय संघात एक बॅकअप म्हणून राहिला आहे. तसेच मिळालेल्या सामन्यात महत्वाच्या क्षणी साहा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरत असल्यामुळे तो संघातून आत-बाहेर होत राहिला आहे. साहाने न्यूझीलंड संघाविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. पण रिषभ पंत विकेटकीपरची भूमिका चोख पार पडत असल्यामुळे आणि मधल्या फळीत आता श्रेयस अय्यरच्या आगमनामुळे साहा याला पुढे संधी मिळण्याची शक्यता कमी दित आहे.
शिखर धवन
शिखर धवन सलामीवीर म्हणून खेळतो, आणि त्यालाही अव्वल स्थानी युवा प्रतिभा खेळाडूंच्या उपस्थितीत कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. शिखर धवनने शेवटचा कसोटी सामना 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. शिखरला सामन्यातील 8 डावांत एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. त्यामुळे या मालिकेनंतर धवनला पुढे कसोटी संघात प्रवेश करता आलेला नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल कसोटी संघात एक सलामीवीर म्हणून उदयास आले आणि रोहित शर्मा-केएल राहुल आधीच सलामीवीर म्हणून पहिली पसंत असल्यामुळे धवनसाठी भारतीय कसोटी संघाचा जवळपास आता बंद झाला आहे.
कुलदीप यादव
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या कसोटी संघातून निवृत्तीनंतर कुलदीप यादवला भारतीय संघात मोजक्या संधी मिळाल्या आहेत. एकावेळी आघाडीचा भारतीय फिरकीपटू असलेला कुलदीप याची कसोटी संघात पुनरागमन कठीण आहे. 2017 मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या कुलदीपने फेब्रुवारी 21 मध्ये टेस्ट डेब्यू केले, पण अधिक संधी मिळाल्या नाही. फिरकी गोलंदाजांमध्ये भारताकडे अनेक पर्याय आहेत. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा मुख्य खेळाडू असून अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जयंत यादव असे पर्यंत भविष्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे मर्यदित षटकांच्या भारतीय संघातून बाहेर पडलेला कुलदीपचे आता कसोटी संघात परतणे कठीण आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)