India Tour Of Sri Lanka 2021: श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या कर्णधारपदासाठी ‘हे’ 3 स्टार खेळाडू असतील प्रमुख दावेदार, कोण मारणार बाजी?

आगामी लंका दौऱ्यावर पहिल्यांदा राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करू शकणाऱ्या 3 संभावित दावेदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली (Photo Credit: PTI)

India Tour Of Sri Lanka 2021: बीसीसीआयचे (BCCI) प्रमुख सौरव गांगुली यांनी जुलै महिन्यात श्रीलंका (Sri Lanka) विरोधात मर्यादित ओव्हरच्या दौर्‍याची पुष्टी केली. विराट कोहलीच्या  (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी युनायटेड किंगडममध्ये राहणार असल्यामुळे श्रीलंकेच्या व्हाइट बॉल दौऱ्यासाठी दुसरा भारतीय संघ निवडला जाणार आहे. 2019 च्या उत्तरार्धात रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग  बनला असल्यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारताला आता एक नवीन कर्णधार मिळणार आहे. कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन कर्णधारपदाच्या समीकरणापासून दूर असल्याने आगामी लंका दौऱ्यावर पहिल्यांदा राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करू शकणाऱ्या 3 संभावित दावेदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत. (भारताच्या श्रीलंका दौर्‍यावर Rahul Dravid करणार संघाचे प्रशिक्षण, NCA सदस्य बजावू शकतात ‘ही’ भूमिका)

शिखर धवन (Shikhar Dhawan)

एशिया कप 2018 च्या आवृत्तीत धवनला म्हणून भारताचा उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले होते. 2020/21 च्या मर्यादित ओव्हरच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी रोहितच्या अनुपस्थितीत धवनला प्राधान्य दिले गेले नाही. श्रीलंकेतील भारताचे नेतृत्व करण्यासाठी तो प्रबळ दावेदार मानला जात आहे. धवनचा एकंदरीत अनुभव आणि नेहमी शांत व सकारात्मक राहण्याच्या क्षमतेमुळे कोहली व रोहितची जागा भरण्यासाठी एक महत्वाचा उमेदवार आहे. याव्यतिरिक्त, त्याला व्हाईट-बॉल फॉरमॅटची चांगली माहिती आहे.

केएल राहुल (KL Rahul)

202-21 ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हरच्या दौऱ्यासाठी धवनच्या जागी उप-कर्णधारपदासाठी राहुलला पसंती दिली गेली होती. आयपीएल 2020 मध्ये पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि यापूर्वी 14व्या आयपीएलच्या पहिल्या सहामाहीत नेतृत्व करत असल्यामुळे राहुलला पदभार सांभाळण्याचा पुरेसा अनुभव आहे. राहुल स्वत: कर्णधार म्हणून अद्याप सिद्ध करायचे असले तरी आयपीएलमध्ये त्याने दाखवून दिले की अतिरिक्त जबाबदारीने त्याला त्याला परावृत्त केले नाही. राहुलची भारताच्या कसोटी संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल व इंग्लंड मालिकेसाठी 'फिटनेसच्या अधीन' संघात स्थान देण्यात आले आहे. पण रेड-बॉल दौऱ्यावर त्याची संघात निवड होत नसल्यास त्याला श्रीलंकेला पाठवले जाऊ शकते.

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही खात्री नसल्यामुळे भुवनेश्वर हे देखील एक अस्थायी कर्णधार म्हणून निवडला जाऊ शकतो. भुवीने आयपीएल 2019 मध्ये केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले करत चांगली कामगिरी केली होती. शांत आणि संयमी वर्तन व विरोधी फलंदाजांसमोर विचार करण्याची क्षमता यासाठी परिचित, 30-वर्षीय वेगवान गोलंदाज एक आदर्श गोलंदाज कर्णधार म्हणून स्वताःला सिद्ध करू शकतो. त्याने व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये एकूण 183 विकेट्स घेतल्या आहेत आणि लंकन परिस्थितीत त्याचा अनुभव भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो.

वर नमूद केलेले तीनही खेळाडू टीम इंडियाच्या मर्यादित ओव्हर संघाचे प्रमुख सदस्य असलेलं तरी अखेरीस कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif