Shikhar Dhawan Retirement: शिखर धवन याची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
क्रिकेट वर्तूळ आणि चाहत्यांमध्ये प्रेमाने 'गब्बर' (Gabbar) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 37 वर्षीय क्रिकेटपटूने आज (शनिवार, 24 ऑगस्ट) भल्या सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरुन ही घोषणा केली.
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan Retires) याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेट वर्तूळ आणि चाहत्यांमध्ये प्रेमाने 'गब्बर' (Gabbar) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 37 वर्षीय क्रिकेटपटूने आज (शनिवार, 24 ऑगस्ट) भल्या सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरुन ही घोषणा केली. 'धावांचे शिखर' असा गौरव केल्या जाणाऱ्या धवन याने केलेल्या घोषणेनुसार क्रिकेटमधील सर्व सर्व फॉरमॅटमधील एक शानदार कारकीर्द आज संपली. आता तो क्रिकेट अथवा आणखी कोणत्या क्षेत्रात वेगळी भूमिका निभावतो याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असेल.
'एक स्वप्न पूर्ण झाले, आता पुढे जाण्याची वेळ आली'
एका दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट टीम मधील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व असलेल्या शिखर धवन याने, एक्स पोस्टच्या माध्यमातून भावनिक व्हिडिओ संदेश जारी केला. ज्यात त्याला मिळालेल्या सर्वांचे सकार्य आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण प्रवासात अतुट पाठिंबा दिल्याबद्दल त्याने त्याचे कुटुंब, बालपणीचे प्रशिक्षक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) यांचे आभार मानले. आपल्या कारकिर्दीवर विचार करताना धवनने नमूद केले की भारताचे प्रतिनिधित्व करणे हे एक स्वप्न पूर्ण झाले होते, परंतु आता त्याच्यावर पुढे जाण्याची वेळ आली आहे. (हेही वाचा, Shikhar-Rohit Friendship: 'तेरे जैसा यार कहां...' फ्रेंडशिप डे निमित्त शिखर धवनने रोहित शर्मासोबतच्या आठवणींना दिला उजाळा, पाहा व्हिडिओ)
रोहित शर्मा आणि शिखर धवन, मैदानावरील हिट जोडी
सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पंजाब किंग्जचे कर्णधार असलेला डावखुरा सलामीवीर असलेल्या शिखर धवन याने, निवृत्तीनंतर पाठिमागे उल्लेखनीय वारसा सोडला आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत 17 शतके आणि 35 अर्धशतकांसह 167 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये 6,793 धावां ठोकल्या आहेत. धवन हा भारताच्या सर्वात विश्वसनीय सलामीवीरांपैकी एक होता. खास करुन रोहित शर्मा याच्यासोबतची त्याची भागीदारी विशेष उल्लेखनीय होती. या जोडीने अनेक गोलंदाजांच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. (हेही वाचा, IPL 2025 Mega Expected Auction Date: आयपीएल 2025 मेगा लिलाव होणार या दिवशी? किती खेळाडूंना ठेवता येईल कायम; सर्व तपशील जाणून घ्या एका क्लिकवर)
शिखर धवन याचा व्हिडिओ संदेश
शिखर धवन कामगिरी
एकदिवसीय क्रिकेटमधील शिखर धवन याच्या कामगिरीवर लक्ष टाकता त्याने 34 कसोटींमध्ये 2,315 धावा आणि 68 T20 आंतरराष्ट्रीय (T20I) मध्ये 1,759 धावा केल्या आहेत. त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध झाला होता, तर 2021 मध्ये त्याची T-20I कारकीर्द संपुष्टात आली. धवनचा कसोटी प्रवास यापूर्वी, 2018 मध्ये थांबला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 112 सामन्यांत 8,499 धावा जमवल्या, ज्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे स्थान आणखी मजबूत झाले.
धवनच्या निवृत्तीने टीम इंडियासाठी सातत्य, लवचिकता आणि संस्मरणीय कामगिरीचा वारसा सोडून एका युगाचा अंत झाला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर म्हणून चाहते आणि क्रिकेट रसिक सारखेच त्यांची आठवण ठेवतील.