Lockdown: शिखर धवन-श्रेयस अय्यरमध्ये रंगला Rapid Fire चा खेळ; मनोरंजक गोष्टींचा केला खुलासा, जाणून घ्या
मंगळवारी इंस्टाग्राम लाइव्हवर श्रेयस अय्यरशी झालेल्या लाईव्ह चॅट दरम्यान भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने त्याच्या पहिल्या वर्ल्ड कप शतक पासून, सर्वात कठीण गोलंदाज आणि आवडती बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल खुलासा केला. कोरोना विषाणूमुळे क्रिकेटपटू सध्या त्यांच्या घरात बंद आहेत आणि ,म्हणून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्राम लाईव्हचा वापर करत आहेत.
मागील वर्षी वर्ल्ड कपमधील (World Cup) ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकाचे वर्णन भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक म्हणून केले. मंगळवारी इंस्टाग्राम लाइव्हवर श्रेयस अय्यरशी (Shreyas Iyer) झालेल्या लाईव्ह चॅट दरम्यान शतक झळकावल्यानंतर आपल्यात मर्द असण्याची भावना निर्माण झाल्याचं धवनने खुलासा केला. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने ओव्हल येथे पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला दुखापत झाली, पण त्यापूर्वी त्याने 109 चेंडूत 117 धावा केल्या आणि भारताला निर्धारित 50 ओव्हरमध्ये 352/5 धावा करण्यास मोलाचा वाट निभावला. ऑस्ट्रेलिया 316 धावांवर ऑलआऊट झाला आणि सामना 36 धावांनी गमावला. नंतर, डाव्या हाताच्या दुखापतीनंतर धवनला वर्ल्ड कपमधून बाहेर राहावे लागले. (कोरोना व्हायरस संकट दूर झाल्यावर शिखर धवन याला रविंद्र जडेजा याच्यासोबत करायचंय 'हे' काम, पाहा)
लाईव्हमध्ये श्रेयसच्या सांगण्यावरून धवनने देखील बासुरी वाजवली. धवन म्हणाला की "कोणताही वाद्य वाजविण्यामुळे तुम्हाला शरीरातील स्पंदन जाणवते. संगीत आपणास शांतता देते आणि या वेळी प्रत्येकाकडे बराच वेळ आहे, म्हणून लोकांनी हा वाजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे." वर्ल्ड कपमधील शतकाची आठवण करत श्रेयसशी बोलताना “मर्दो वाली भावना आ गायी,” म्हणाला. धवनने या सांगितले की, त्याने सामना केलेल्या गोलंदाजांपैकी डेल स्टेन सर्वात कठीण गोलंदाज आहे. शिवाय, रॅपिड फायर राउंडमध्ये आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारल्यावर धवनने करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांचे नाव घेतले.
लॉकडाऊन दरम्यान धवन सोशल मीडियावर एक सर्वाधिक सक्रिय असणारा भारतीय क्रिकेटपटू आहे. कधी तो पोछा ट्रेनिंगचा व्हिडीओ बनवत आहे, तर कधी तो या कोरोनाशी लढण्यासाठी लोकांना जागरूक करत आहे. कोरोना विषाणूमुळे क्रिकेटपटू सध्या त्यांच्या घरात बंद आहेत आणि ,म्हणून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्राम लाईव्हचा वापर करत आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि युवराज सिंहदेखील इंस्टाग्राम लाईव्ह चॅट करताना दिसले होते.