शेन वॉर्न ने ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट वनडे XI एलन बॉर्डर यांची केली कर्णधार म्हणून निवड; सचिन तेंडुलकर, सहवागचा वर्ल्ड वनडे XI मध्ये समावेश

वॉर्नने ग्रेटेस्ट वर्ल्ड वनडे इलेव्हनचीही निवड केली. यात त्याने दोन भारतीय सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवागचाही समावेश केला.

शेन वार्न (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने (Shane Warne) मंगळवारी माजी महान फलंदाज अ‍ॅलन बॉर्डर (Allan Border) यांना ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय महान वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवडले. इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रादरम्यान त्याने इलेव्हनची निवड केली आणि त्याच्या कारकिर्दीत तो ज्या खेळाडूंसोबत खेळला त्या खेळाडूंची त्याने निवड केली. वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून 194 एकदिवसीय सामने खेळले आणि 50 षटकांच्या कारकिर्दीत 293 विकेट्स घेतल्या आहेत. 20 विकेट्स घेणारा वॉर्न ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियाच्या 1999 विश्वचषकातील अंतिम संघातील तो महत्त्वपूर्ण सदस्य होता. पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात त्याने 33 धावा देत 4 वकेट्स घेतल्या. कोणत्याही वर्ल्ड कप फायनलमध्ये फिरकी गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ठरली आहे. वॉर्नच्या ऑस्ट्रेलिया वनडे इलेव्हन संघात वर्ल्ड कप विजेते कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि माइकल क्लार्क यांचा समावेश आहे. (भारतविरुद्ध खेळल्या सर्वोत्तम XI ची शेन वॉर्न ने केली निवड; सौरव गांगुली कर्णधार तर लक्ष्मण, धोनी आणि विराट कोहलीला वगळले)

शिवाय, वॉर्नने ग्रेटेस्ट वर्ल्ड वनडे इलेव्हनचीही निवड केली. यात त्याने दोन भारतीय सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सहवागचाही (Virender Sehwag) समावेश केला. शिवाय, ब्रायन लारा, वसीम अकरम, कुमार संगकारासह अन्य देशांतील दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. वॉर्नने संगकाराची कर्णधार म्हणून निवड केली आहे. वॉर्नने सहवाग-जयसूर्याची सलामी फलंदाज म्हणून निवड केली. सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नने ब्रायन लाराची चौथ्या आणि त्यानंतर इंग्लंडचा केविन पीटरसन 5 व्या स्थानावर निवड केली. वॉर्नने महेंद्र सिंह धोनीकडे दुर्लक्ष केले आणि श्रीलंकेच्या संगकाराला विकेटकीपर फलदांज म्हणून निवडले.

वॉर्नचा महान ऑस्ट्रेलिया वनडे XI: मार्क वॉ, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, रिकी पॉन्टिंग, डीन जोन्स, माइकल क्लार्क, अ‍ॅलन बॉर्डर (c), माइकल बेवन, एंड्रयू साइमंड्स, ब्रेट ली, क्रेग मेकडरमोट, ग्लेन मैकग्राथ.

वॉर्ननेचा महान वर्ल्ड वनडे XI: वीरेंद्र सहवाग, सनथ जयसूर्या,  सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, केविन पीटरसन, कुमार संगकारा (wk), अँड्र्यू फ्लिंटॉफ, वसीम अक्रम, डॅनियल व्हेटोरी, शोएब अख्तर, कर्टली एम्ब्रोस.