भारतविरुद्ध खेळल्या सर्वोत्तम XI ची शेन वॉर्न ने केली निवड; सौरव गांगुली कर्णधार तर लक्ष्मण, धोनी आणि विराट कोहलीला वगळले

स्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने भारतीय संघाविरुद्ध खेळलेल्या सर्वोत्तम इलेव्हन निवडला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण याला वॉर्नने वगळले. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याने माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना दिली. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 2001 ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रसिद्ध टेस्ट मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

शेन वॉर्न आणि सौरव गांगुली (Photo Credit: Getty Images)

भारत (India)-ऑस्ट्रेलियामधील (Australia) क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता लागलेली असते. दोन्ही देशांतील क्रिकेट टीममध्ये अनेक संस्मरणीय सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने (Shane Warne) भारतीय संघाविरुद्ध खेळलेल्या सर्वोत्तम इलेव्हन निवडला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याला वॉर्नने वगळले. लक्ष्मणचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात आणि ऑस्ट्रेलियामधील रेकॉर्ड उत्कृष्ट असतानाही वॉर्नने त्याला सर्वोत्तम भारत इलेव्हनमधून डच्चू दिला. इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रादरम्यान फिरकीच्या जादूगारने त्याच्या कारकीर्दीत त्याने ज्या खेळाडूंच्या विरोधात खेळले त्यापैकीआपली महान भारतीय इलेव्हनची निवड केली. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याने माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना दिली. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 2001 ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रसिद्ध टेस्ट मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. शिवाय त्याने विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांचीही वॉर्नने निवड केली नाही. (ऑलटाइम अ‍ॅशेस XI मधून शेन वार्नने स्वतःला वगळले, 'या' महान ऑस्ट्रेलियाई बनवले कॅप्टन)

वॉर्नने वीरेंद्र सेहवाग आणि नवजात सिंह सिद्धूची सलामी जोडी म्हणून निवड केली. सिद्धूचा फक्त फिरकीविरूद्ध रेकॉर्ड चांगला असल्यामुळेच समावेश केल्याचं वॉर्नने म्हटले. त्याने तिसऱ्या क्रमांकासाठी 'द वॉल' राहुल द्रविडची निवड केली. वॉर्न आणि द्रविड आयपीएल फ्रॅन्चायसी राजस्थान रॉयल्सकडून एकत्र खेळले. दुसरीकडे, वॉर्नने फक्त तीन गोलंदाजांची निवड केली. यात हरभजन सिंह, अनिल कुंबळे आणि जावगल श्रीनाथ यांचा समावेश आहे. वॉर्नने सध्याचे टीम इंडियाचे स्टार्स धोनी आणि कोहलीविरुद्ध न खेळण्याने निवड केली नसल्याचे त्याने म्हटले. वॉर्नचा भारतविरुद्ध रेकॉर्ड मिश्रित राहिला आहे. त्याने 24 टेस्ट सामन्यात 43 विकेट्स आणि 18 वनडे सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहेत. वॉर्नच्या या टीममध्ये सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव, नयन मोंगिया यांचाही समावेश आहे.

(Photo Credit: Instagram/Shane Warne)

वॉर्नचं महान भारतीय इलेव्हनः वीरेंद्र सहवाग, नवजोत सिंह सिद्धू, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली (कॅप्टन), कपिल देव, हरभजन सिंग, नयन मोंगिया, अनिल कुंबळे, जावगल श्रीनाथ.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now