ऑलटाइम अ‍ॅशेस XI मधून शेन वार्नने स्वतःला वगळले, 'या' महान ऑस्ट्रेलियाई बनवले कॅप्टन

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने लोकप्रिय सोशल नेटवर्किंग अ‍ॅप इंस्टाग्रामवर थेट व्हिडिओ चॅट दरम्यान एकत्रित अ‍ॅशेस इलेव्हनची निवड केली. वॉर्नने एलन बॉर्डर यांची वॉर्नने कर्णधार म्हणून नियुक्ती केली. या सर्वांमध्ये विशेष म्हणजे वॉर्नने स्वतःला प्लेयिंग इलेव्हनमधून वगळले आहे.

शेन वार्न (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न (Shane Warne) याने लोकप्रिय सोशल नेटवर्किंग अ‍ॅप इंस्टाग्रामवर थेट व्हिडिओ चॅट दरम्यान एकत्रित अ‍ॅशेस इलेव्हनची (Ashes XI) निवड केली. कोरोना व्हायरसमुळे कोणतेही आंतरराष्ट्रीय किंवा घरगुती क्रिकेट स्पर्धा होत नसल्याने माजी आणि सध्याचे क्रिकेट स्टार सोशल मीडियावर चाहत्यांसह संवाद साधत स्वत:ला व्यस्त ठेवत आहेत. वॉर्नने एका इन्स्टाग्राम लाइव्ह व्हिडिओ सत्राचे आयोजन केले होते, ज्यात त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश असलेल्या टीमला एकत्र केले, ज्यांनी वर्षानुवर्षे अ‍ॅशेस कसोटी मालिकेत भाग घेतला. दोन्ही देशांमध्ये असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी आजवर अ‍ॅशेस टेस्ट मालिकेत भाग घेतला आहे. आणि जागतिक स्तरावरील दोन्ही देशांतील अशा खेळाडूंचा संघ बनविण्याचे कठीण काम वॉर्नने केले. (शेन वॉर्न ने निवडला आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन टेस्ट XI, 'या' दिग्गजांना मिळाला डच्चू)

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन आणि इंग्लंडचा माजी कर्णधार ग्राहम गूच यांना वॉर्नने संघात सलामी फलंदाज म्हणून निवडले. दोघांनी क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये 9000 ज्या जवळ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याला वॉर्नने तिसऱ्या स्थानावर ठेवले आहे. पॉन्टिंगनंतर आहे मार्क वॉ, जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. अ‍ॅशेसमध्ये इंग्लंडकडून अनेक कसोटी विजयांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारा केविन पीटरसनचीही निवड वॉर्नने केली. वॉर्नने एलन बॉर्डर यांची वॉर्नने कर्णधार म्हणून नियुक्ती केली. आपल्या कारकीर्दीत बॉर्डर यांनी 11,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अ‍ॅडम गिलक्रिस्ट मधल्याफळीत फलंदाजी करत विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळेल. या सर्वांमध्ये विशेष म्हणजे वॉर्नने स्वतःला प्लेयिंग इलेव्हनमधून वगळले आहे. वॉर्नने संघाचा एकमेव फिरकीपटू म्हणून माजी स्पिनर टिम मेची (Tim May) स्वत: पुढे निवड केली. 36 अ‍ॅशेस कसोटी सामन्यांत 195विकेट्स घेतल्या असला तरी वॉर्नरने मेची निवड केली ज्याने संपूर्ण टेस्ट कारकिर्दीत 24 सामन्यात 75 गडी बाद केले.

 

View this post on Instagram

 

Thankyou to everyone who joined me today on IG live. See you tmrw. This is my combined ashes team and best England team that I played against ! Ashes 💚💛 Gooch, Hayden,Ponting, M Waugh, KP, Border (c), Gilly, Flintoff, May, Gough, Mcgrath England team 💙❤️ Gooch, Strauss, Vaughan (C), KP, Hussain, Stewart (wk), Flintoff, Giles, Gough, Harmison, Anderson

A post shared by Shane Warne (@shanewarne23) on

वॉर्नचे ऑलटाइम अ‍ॅशेस XI: मॅथ्यू हेडन, ग्राहम गूच, रिकी पॉन्टिंग, मार्क वॉ, केविन पीटरसन, एलन बॉर्डर, एंड्रयू फ्लिंटॉफ, एडम गिलक्रिस्ट, टिम मे, डैरेन गफ, ग्लेन मैकग्राथ.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now