COVID-19: 'मला आशा आहे की, तुम्ही लवकरच बरे व्हाल' बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफरीदी याचे ट्विट
त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री उशीरा ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली होती.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री उशीरा ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच अमिताभ बच्चन लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी अनेकांनी प्राथना केली आहे. यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू शाहिद अफरीदी (Shahid Afridi) यानीही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. मला आशा आहे की, तुम्ही लवकरच बरे व्हाल, अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. ‘एएनआय’ने ट्विट करुन ही माहिती दिली होती. अमिताभ बच्चन यांनी रात्री उशीरा ट्विट करुन करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. या माहितीनंतर त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अमिताभ बच्चनसह अभिषेक बच्चन यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या बिग बींप्रमाणेच त्याच्यावरही नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांना कोविड 19 वर मात करण्यासाठी लता मंगेशकर, माधुरी दीक्षित ते सचिन तेंडुलकर पर्यंत मान्यवरांच्या शुभेच्छा!
शाहिद अफरीदी याचे ट्विट-
अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. अनेक जण ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. यामध्येच उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योर्तिंलिंग मंदिरात बिग बी आणि अभिषेकसाठी पूजा करण्यात येत आहे. ‘एएनआय’ने ट्विट करत ही माहिती दिली आहे.