PSL सामन्यात Shaheen Afridi याने उडवला सासरा शाहिद आफ्रिदीचा त्रिफळा, सोशल मीडियावर ‘दूल्हे राजा’ व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
याची पुष्टी स्वतः शाहिद आफ्रिदीने रविवारी सोशल मीडियाद्वारे केली. या दरम्यान, सोशल मीडियावरही याचा फिवर पाहायला मिळत आहे. ट्विटरवर एका यूजरने पीएसएल स्पर्धेतील दोघांचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची (Shahid Afridi) मोठी मुलगी अक्सा आणि क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (Shaheen Shah Afridi) लग्नाची सध्या क्रिकेट विश्वात चर्चस सुरु आहे. याची पुष्टी स्वतः शाहिद आफ्रिदीने रविवारी सोशल मीडियाद्वारे केली. पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद यांनी ट्विट केले की, “शाहिनच्या कुटुंबीयांनी माझ्या मुलीसाठी माझ्या कुटूंबाशी संपर्क साधला. दोन्ही कुटुंबं संपर्कात आहेत. स्वर्गात ही जोडी तयार झाली आहे. जर अल्लाहची इच्छा असेल तर ही जोडी देखील तयार होईल. शाहीनला मैदानावर सतत यश मिळावे यासाठी माझे प्रार्थना आहेत.” यावर शाहिननेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की- “अल्हमदुल्लाह. आपल्या प्रार्थना धन्यवाद. अल्लाह सर्वांसाठी गोष्टी सुलभ करेल. तुम्ही राष्ट्राचा अभिमान आहात.” या दरम्यान, भावी सासरे शाहिद आफ्रिदी आणि भावी 'जावई' शाहीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (पाकिस्तानचा स्टार खेळाडू Shahid Afridi लवकरच होणार सासरा; मुलगी Aqsa आणि क्रिकेटर Shaheen Shah Afridi यांचे ठरले लग्न)
अक्सा (Aqsa) आणि शाहिन दोघेही 20 वर्षाचे आहेत शाहिन क्रिकेट खेळतोय तर अक्साचं शिक्षण सुरु आहे. दोन्ही परिवार आता एकत्र होणार असल्याने सोशल मीडियावरही याचा फिवर पाहायला मिळत आहे. ट्विटरवर एका यूजरने पीएसएल स्पर्धेतील दोघांचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये शाहिनने आपल्या बोलिंगवर शाहिद आफ्रिदीचा त्रिफळा उडवला मात्र बाद केल्यानंतर त्यांने शाहिदची विकेट एन्जॉय केली नाही. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये अभिनेता गोविंदाच्या ‘दुल्हे राजा’ चित्रपटाचे शीर्षक गीत ‘सुनो ससुर जी अब जिद छोड़ो, दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ’ हे गाणे ऐकू येत आहे. शाहीन आणि अक्साच्या साखरपुढ्याच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर युजर्स या गमतीशीर व्हिडिओचा भरपूर आनंद घेत आहे.
शाहिद आफ्रिदी आणि शाहीन शाह आफ्रिदीचे ट्विट
दरम्यान, वृत्तानुसार शाहीनचे वडील अयाज खान यांनी पाकिस्तानी माध्यमांना सांगितले की त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठीचा प्रस्ताव शाहिद आफ्रिदीच्या कुंटुंबासमोर ठेवला जो की त्यांनी मान्य केला आहे. दरम्यान, आफ्रिदी आणि शाहीन दोघे अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) खेळताना दिसले होते.