Pakistan Cricketers Test Positive For Covid19: इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा झटका; मोहम्मद हाफिज, वहाब रियाज यांच्यासह आणखी 7 जणांना कोरोनाची लागण
इंग्लड दौऱ्यावर रवाना होण्याआधीच पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. परदेशी दौऱ्यावर निघण्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सर्व खेळाडूंची कोरोना (Coronavirus Test) चाचणी घेतली होती.
इंग्लड दौऱ्यावर रवाना होण्याआधीच पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. परदेशी दौऱ्यावर निघण्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सर्व खेळाडूंची कोरोना (Coronavirus Test) चाचणी घेतली होती. शादाब खान (Shadab Khan), हैदर अली (Haider Ali) आणि हारीस रौफ (Haris Rauf) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर मोहम्मद हाफिज (Muhammad Hafeez) , वहाब रियाज (Wahab Riaz) यांच्यासह पाकिस्तान क्रिकेट संघातील आणखी 7 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पीसीबीने दिली आहे. ज्यामुळे क्रिक्रेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा संघ 28 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार होता. यामुळे पाकिस्तान संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्यात पाकिस्तान संघातील एकूण 10 जण कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे समजत आहेत.
सोमवारी शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ यांना कोरोनी लागण झाल्याचे समजले. त्यानंतर फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या 7 जणांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली. पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता त्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हे देखील वाचा- Women's T20 World Cup 2020 Viewership: महिला टी-20 वर्ल्ड कपने नोंदवला व्युव्हरशीप रेकॉर्ड, बनला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम
एएनआयचे ट्वीट-
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 3 कसोटी सामने आणि 3 टी-20 सामने खेळण्यात येणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी देण्यात आली नाही
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)