Happy Birthday Sara Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर झाली 23 वर्षांची! वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केला 'हा' सुंदर फोटो

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने साराने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

Sara Tendulkar (Photo Credit: Instagram)

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांची मुलगी सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) हिचा आज 23वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने साराने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत सारा अनेक रंगाच्या फुग्यांसह दिसत आहे. दरम्यान, तिच्या हातात 23 नंबर दर्शवणारे 2 वेगवेगळे फुगे दिसत आहे. सचिन तेंडूलकर यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. तसेच साराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

साराचा जन्म 13 ऑक्टोबर 1997 मध्ये झाला होता. याच वर्षी भारतीय क्रिकेट संघाने लोकप्रिय टूर्नामेंट सहारा कपवर विजय मिळवला होता.1997 मध्ये कर्णधार म्हणून सचिनने प्रथमच जिंकलेली ही पहिली टूर्नामेंट होती. ही टूर्नामेंट कॅनडा मध्ये पार पडली होती. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला 4-1 असे पराभूत केले होते. त्यावेळी सचिनने आपल्या मुलीचे नाव सारा ठेवण्याचे नक्की केले होते. हे देखील वाचा-SRH Vs CSK Dream11 Team Prediction IPL 2020: ड्रीम 11 गेममध्ये अधिक पॉईंट मिळवण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात 'या' खेळाडूंची करा निवड

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

23🕺🏻

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

मुंबईत जन्मलेल्या साराने युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथून मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. सारा तेंडुलकरचे नाव जगातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या स्टार किड्सच्या यादीत येते. आपल्या शिक्षणानंतर ती आता आपल्या करिअरलाही सुरुवात करण्याची तयारी करत आहे. 1990 मध्ये सचिन तेंडुलकरने मॅनचेस्टरमध्ये आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. त्यावेळी सचिनला भेट म्हणून शँपेनची एक बॉटल मिळाली होती. सचिन तेव्हा अंडर-18 होता. त्यामुळे त्याने तेव्हा ती बॉटल उघडली नाही, मात्र 8 वर्षांनी जेव्हा साराचा जन्म झाला तेव्हा या खुशीत सचिनने ही शँपेनची बॉटल उडवली होती.