टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षक पदावरून काढून टाकलेल्या संजय बांगर यांनी केले निवडकर्त्याबरोबर गैरवर्तन, BCCI कडून कारवाईची शक्यता
पीटीआयच्या वृत्तानुसार 5 वर्षे भारतीय फलंदाजी प्रशिक्षकपदावरून काढून टाकलेल्या बांगर यांनी संतप्त राष्ट्रीय निवडकर्ता दिबांग गांधी यांच्यावर त्यांचा राग व्यक्त केला.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) वादात सापडले आहेत. वेस्ट इंडिज (West Indies) दौर्यादरम्यान बांगर यांनी निवडकर्त्याशी गैरवर्तन केल्याचे सांगण्यात येत आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर टीम इंडियाचा नवीन कोचिंग स्टाफ पदभार स्वीकारेल. बांगरच्या जागी विक्रम राठोड (Vikram Rathor) यांची टीमच्या फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार 5 वर्षे भारतीय फलंदाजी प्रशिक्षकपदावरून काढून टाकलेल्या बांगर यांनी संतप्त राष्ट्रीय निवडकर्ता दिबांग गांधी (Debang Gandhi) यांच्यावर त्यांचा राग व्यक्त केला. नुकतेच पार पडलेल्या वेस्ट इंडीज दौर्याच्या वेळी हॉटेलच्या खोलीत बांगर यांनी गांधींशी फार वाईटपणे बोलणी केली असे सांगितले जात आहे.
पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "अशा परिस्थितीत आपण नियमांच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते पहावे लागेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे बांगर यांनी अपमानित केलेली व्यक्ती राष्ट्रीय निवडकर्ता आहे. त्यांनी याबाबत अधिकृतपणे रिपोर्ट द्यावी लागेल." बांगर यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रीय निवडकर्त्यां गांधींनी अधिकृत तक्रार दाखल करायला पाहिजे. निवर्तलेले प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम किंवा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबाबत अधिकृत अहवाल दाखल केल्यास राष्ट्रीय निवडकर्ता देवांग गांधी यांच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल बांगर यांची बीसीसीआयमार्फत चौकशी केली जाईल. महत्वाचे म्हणजे, कोचिंग स्टाफपैकी केवळ बांगर यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर (R Sridhar) यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोचसाठी मुलाखत सुरू असताना ही घटना घातली असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजयने देवांगला सांगितले की टीम इंडियाचे खेळाडू त्याच्या कोचिंगने खुश आहेत. जर त्यांना काही अडचण नसेल तर त्यांना प्रशिक्षकपदावरून का हटविण्यात आले आहे. हा चुकीचा निर्णय आहे. मिळालेल्या माहितीनुसार बांगर यांनी गांधी यांना असेही सांगितले की जर त्यांना फलंदाजी प्रशिक्षकपदावरून काढून टाकले जात असेल तर त्यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये स्थान मिळवावे. असे म्हटले जाते की बांगर यांच्या या कृत्याने बोर्ड खूप नाराज आहे आणि सीओए प्रमुख विनोद राय यांना याबद्दलची संपूर्ण माहिती दिली गेली आहे.