International निवृत्तीनंतर ‘या’ क्रिकेटपटूंनी पकडली वेगळी वाट; भारताच्या T20 वर्ल्ड कप विजेत्याने घातला पोलिस युनिफॉर्म तर हा मुंबईकर बनला अभिनेता

एखाद्या क्रिकेटपटूच्या कारकीर्दीची सरासरी कारकीर्द साधारणतः 8 ते 10 वर्षाची असते. सुदैवाने निवृत्त क्रिकेटपटूंकडे बरेच मार्ग आहेत ज्यामुळे ते क्रिकेटच्या खेळाशी जुळून राहू शकतात. तथापि, असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी क्रिकेटपासून दूर करिअरचा पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. हे खेळाडू आपापल्या संघासाठी यथोचित यशस्वी ठरले होते पण निवृत्तीनंतर ते दुसऱ्या व्यवसायात रमले.

जोगिंदर शर्मा (Photo Credit: Getty Images)

Cricketers Who Chose Unusual Profession After Retirement: कोणत्याही व्यावसायिक क्रीडापटूसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्तीचा निर्णय घेणे नेहमीच वेदनादायक असतो, क्रिकेटपटू (Cricket) देखील याला अपवाद नाही आहे. एखाद्या क्रिकेटपटूच्या कारकीर्दीची सरासरी कारकीर्द साधारणतः 8 ते 10 वर्षाची असते. पण असेही काही आहे ज्यांनी आपल्या फिटनेसच्या जोरावर अनेक दशकं क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवले आहेत. सुदैवाने निवृत्त क्रिकेटपटूंकडे बरेच मार्ग आहेत ज्यामुळे ते क्रिकेटच्या खेळाशी जुळून राहू शकतात. जसे क्रिकेट प्रशासन, प्रशिक्षण, भाष्यकार असे अनेक कारकीर्दीचे पर्याय निवृत्तीनंतर बहुतेक क्रिकेटपटू घेतात. तथापि, असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी क्रिकेटपासून दूर करिअरचा पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. हे खेळाडू आपापल्या संघासाठी यथोचित यशस्वी ठरले होते पण निवृत्तीनंतर त्यांनी दुसऱ्या व्यवसायात दुसरी इंनिंग सुरु केली. (टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूंसोबत लग्नानंतर ‘या’ 5 बॉलीवूड अभिनेत्रींच्या करिअरवर लागला ब्रेक)

सलील अंकोला (Salil Ankola)

1989 मध्ये जेव्हा भारतीय वनडे संघात सलील अंकोलाने योगायोगाने आपला मुंबईचा सहकारी सचिन तेंडुलकरसह पदार्पण केले. दुर्दैवाने, अंकोलाची कारकीर्द कधीच संपली नाही कारण त्याने एक कसोटी आणि 20 वनडे सामने खेळले. सलील कधीच भारतीय संघात आपले स्थान निश्चित करू शकला नाही. त्यानंतर त्याने अभिनयाकडे आपले लक्ष वळवण्याचे ठरवले आणि 2000 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अंकोलाने आतापर्यंत अवघ्या 7 चित्रपटांत काम केले असले तरी त्याने बर्‍याच टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले असून तो यशस्वी झाला आहे.

जोगिंदर शर्मा (Joginder Sharma)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2007 च्या फायनल सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मिसबाह-उल-हकच्या शेवटच्या बॉल विकेटसाठी प्रसिद्ध असलेल्या शर्माने निवृत्तीनंतरच्या कारकीर्दीने प्रत्येकासाठी उदाहरण ठेवले आहे. हरयाणामधील कुरुक्षेत्र जिल्ह्यात उपअधीक्षक पदावर 2007 पासून ते सध्या हरियाणा पोलिसात कार्यरत आहेत.

नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu)

नवजोत सिंह सिद्धू आपल्या सक्रिय दिवसात विरोधी गोलंदाज, विशेषत: फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक बॅटिंगसाठी ओळखले जायचे. सिद्धूने 51 कसोटी आणि 136 वनडे सामने खेळले आणि अनेकांना वाटले की त्याने आणखी बरेच काही साध्य केले असते. सिद्धू आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अपेक्षेपेक्षा कमी पडला असले, पण क्रिकेटनंतरची कारकीर्द खूप चांगली ठरली. क्रिकेट भाष्यकार म्हणून असो वा विनोदी कार्यक्रम जज म्हणून त्याचा हास्य दंगल असो, निवृत्तीनंतर सिद्धूची मागणी भरपूर राहिली. 2004 मध्ये जेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीतून भाजपकडून त्यांनी राजकीय खेळपट्टीवर दुसरी इंनिंग सुरु केली.

अँड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff)

फ्लिंटॉफ त्याच्या सक्रिय दिवसांत एक अत्यंत उत्कट क्रिकेटपटू होता. आणि कदाचित हेच कारण आहे की त्याने निवृत्तीनंतर व्यावसायिक बॉक्सर बनण्याचा निर्णय घेतला. फ्लिंटॉफने आपल्या बॉक्सिंगच्या महत्त्वाकांक्षेसाठी बरेच वजन कमी केले. इंग्लंडच्या फलंदाजाने 2012 मध्ये रिचर्ड डॉसनविरुध्द बहुचर्चित फाईट जिंकली. तथापि, त्यानंतर फ्लिंटॉफने बॉक्सिंग सोडून दिले आणि 2014-15 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये थोडक्यात पुनरागमन करत बिग बॅश लीगमध्ये खेळला. फ्लिंटॉफ सध्या रिअल इस्टेट व्यवसायात सामील आहे.

इमरान खान (Imran Khan)

क्रिकेटमधील आजवरच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणजे, इमरान खान हे जगातील 5 व्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचे प्रमुख आहेत. इमरानने 1992 मध्ये पाकिस्तानला पहिले आणि एकमेव जागतिक जेतेपद मिळवून दिले होते. 20 पेक्षा जास्त वर्षे क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवल्यावर निवृत्तीनंतर इमरानने राजकारणात प्रवेश केला. वर्षानुवर्षे केलेल्या कामाचा अखेर इमरान यांना फळ मिळाले आणि 2018 मध्ये ते पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now