IPL Auction 2025 Live

MS Dhoni Birthday Pic: एमएस धोनी याच्या 39 व्या वाढदिवसाची पत्नी साक्षी धोनीने शेअर केली झलक, म्हणाली- येतेय 'Happy Squad' ची आठवण (See Photo)

साक्षीने इंस्टाग्रामवर पांड्या बंधू हार्दिक आणि क्रुणाल आणि कृणालची पत्नी पंखुरी शर्मासह धोनीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला. हा फोटो धोनीच्या 39 व्या वाढदिवसाचा आहे जेव्हा पांड्या बंधू रांची येथील धोनीच्या फार्महाऊसवर गेले होते.

एमएस धोनीसह हार्दिक आणि क्रुणाल पांड्यासमवेत त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये ( Photo Credits: Instagram/@sakshisingh_r)

साक्षी सिंह रावत (Sakshi Singh Rawat) आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे खेळापासून दूर असलेल्या महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) जीवनाची झलक सतत शेअर करत आहेत. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या वर्ल्ड कप-विजेत्या क्रिकेटपटूविषयी अपडेट करण्याचे साक्षी या लॉकडाऊन काळात सुनिश्चित करत आहे. मंगळवारी साक्षीने इंस्टाग्रामवर पांड्या बंधू-हार्दिक (Hardik Pandya) आणि क्रुणाल (Krunal Pandya) आणि कृणालची पत्नी पंखुरी शर्मासह धोनीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला. हा फोटो धोनीच्या 39 व्या वाढदिवसाचा आहे जेव्हा पांड्या बंधू रांची येथील धोनीच्या फार्महाऊसवर गेले होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन निर्बंध असतानाही हार्दिक आणि क्रुणाल 7 जुलै रोजी धोनीच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी रांचीला पोहचले होते. साक्षीने फोटोला कॅप्शन देत म्हटले की तिला या आनंदी स्क्वाडची आठवण येत आहे. साक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये धोनी, कृणाल आणि हार्दिक, कृणालची पत्नी पंखुरी शर्मा आणि त्यांच्या अन्य मित्रांसह झिवाही दिसत आहे. (CSK ने खास गाण्याद्वारे एमएस धोनी याला दिले ट्रिब्यूट, चाहत्यांनी नवीन लूकचे केले कौतुक Watch Video)

"आनंदी स्क्वाडची आठवण येत आहे," असे कॅप्शन साक्षीने दिले. धोनी एक गुरु आणि सिनिअर सहकारी असला तरी तो आपला तरी अनुभवी विकेटकीपरला आपला भाऊ मानत असल्याच्या विधानावर हार्दिकने नेहमीच जोर दिला. उल्लेखनीय म्हणजे, नोव्हेंबर 2019 मध्ये हार्दिक रांची येथे साक्षी रावतच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजर होता.

पाहा साक्षी धोनीच्याआनंदी स्क्वाडचा फोटो:

 

View this post on Instagram

 

Missing the happy squad !

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

खेळापासून दूर धोनी रांचीमधील आपल्या फार्महाऊसवर आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसमवेत वेळ घालवत आहे. सेंद्रिय खताची शेती करण्यापासून आपल्या मुलीसह खेळण्यापर्यंत धोनी लॉकडाऊनचा पुरेपूर वापर करताना दिसला. तथापि, त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध लॉकडाउन काळात धोनी सोशल मीडियापासून दूर राहिला. एकीकडे अनेक खेळाडू इंस्टाग्रामवर लाइव्ह चॅटद्वारे एकमेकांशी संवाद साधत चाहत्यांचे मनोरंजन करत होते, तर धोनी या सर्वांपासून दूर राहिला. 2019 च्या विश्वचषकानंतर धोनी स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही, पण आता आयपीएल जवळपास निश्चित झाल्याने धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत क्रिकेटच्या मैदानावर परतेल.