Sagarika Ghatge and Zaheer Khan Expecting First Child: सागरिका घाटगे आणि जहीर खान यांच्याकडे गोड बातमी? कपल आई-बाबा होणार असल्याची चर्चा

सागरिका आणि जहीर खान (Photo Credits-Instagram)

Sagarika Ghatge and Zaheer Khan Expecting First Child: बॉलिवूड मधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार यांच्याकडे लवकरच पाळणा हलणार आहे. कारण आता हे दोघे आई-बाबा होणार असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे या दोघांना त्यांच्या चाहत्यांकडून आणि प्रेमींकडून आशीवार्दासह या गोष्टीबद्दल आनंद व्यक्त केला होता. तर अनुष्का नंतर आता जहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे त्यांच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु झाली आहे.

सध्या दुबईत सुरु असलेल्या आयपीएल च्या ठिकाणी सागरिका सुद्धा गेली जहीर सोबत गेली आहे. जहीर याने त्याचा नुकताच वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी सागरिका हिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला असून त्यात बेबी बंम्प दिसून आल्याचे बोलले जात आहे. तर या दोघांच्या काही मित्रापरिवाराने ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची म्हटले आहे. परंतु सागरिका किंवा जहीर यांच्याकडून याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.(Anushka Sharma Baby Bump Photo: अनुष्का शर्मा ने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला बेबी बंपचा फोटो, करीना कपूर, मौनी रॉयसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्समधून दिल्या शुभेच्छा)

 

View this post on Instagram

 

To my best friend, my love and the most selfless person I know . Thank you for being you. Not only me but everyone knows I would be lost without you . Happy birthday husband . May you get everything you desire and more . Love you

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

तर सागरिका जरी प्रेग्नंट असेल तर ती एकटी सेलिब्रेटी नाही आहे. कारण तिच्यासोबत अनुष्का शर्मा आणि करीना कपूर खान सुद्धा प्रेग्नंट आहेत. अनुष्का आणि करीन या दोघींनी त्यांच्या बेबी बंम्पचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्याने ते चांगलेच व्हायरल झाल आहेत. त्यामुळे आता सागरिका आता कधी गोड बातमी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now