Sachin Tendulkar Wishes Zaheer Khan on Birthday: झहीर खानच्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरने केली माजी MI गोलंदाजाची पोल खोल, पाहा Tweet
"इथे पण रिवर्स स्विंग झॅक! आता तरी लोकांना संघ की तुझा वाढदिवस आज आहे, 7 तारखेला नाही! मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा," सचिनने ट्विट केले.
भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) गुरुवारी भारतीय संघाचा त्याचा माजी सहकारी झहीर खानची (Zaheer Khan) एका पोल खोल केली आणि म्हणाला की त्याचा वाढदिवस एक दिवसाआधी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी नव्हे तर 8 ऑक्टोबरला आहे. झहीर आज 42 वर्षांचा झाला. 7 ऑक्टोबरला झहीरला सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि क्रीडाविश्वाने शुभेच्छा दिल्या पण तेंडुलकरने आज त्याला शुभेच्छा दिल्या. झहीरच्या अधिकृत नोंदीनुसार त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर, महाराष्ट्रात झाला होता. परंतु त्याची वास्तविक जन्मतारीख 8 ऑक्टोबर 1978 असल्याचे उघड झाले. सचिनने सोशल मीडियावर झहीरची वास्तविक जन्मतारीख उघडकीस आणली आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी वेगवान गोलंदाजाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्टला एक अनोखा ट्विस्ट दिला. "इथे पण रिवर्स स्विंग झॅक! आता तरी लोकांना संघ की तुझा वाढदिवस आज आहे, 7 तारखेला नाही! मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा," सचिनने ट्विट केले. (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात वॉशिंग्टन सुंदर याची उत्कृष्ट कामगिरी; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडून कौतूकाचा वर्षाव)
दरम्यान, सचिनच्या या दाव्याला झहीरची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेने देखील दुजोरा दिला जिने गुरुवारी सकाळी इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या. "माझ्या जिवलग मित्रासाठी, माझे प्रेम आणि मला ओळखत असलेल्या सर्वात निस्वार्थी व्यक्तीसाठी. आपण असल्याबद्दल धन्यवाद! फक्त मीच नाही तर सर्वांना माहित आहे की मी तुझ्याशिवाय हरवून गेले असते. वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरा. तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील. लव यू," सागरिकाने इन्स्टाग्रामवर लिहिले.
सचिनची पोस्ट
आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने देखील झहीरच्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये खेळाडूंनी झहीरचे एका शब्दात वर्णन केले. पाहा...
सागरिकाची पोस्ट
दरम्यान, झहीर ऑक्टोबर 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. सर्व फॉरमॅटमध्ये 597 विकेटसह झहीर भारताचा तिसरा यशस्वी गोलंदाज ठरला. कसोटीत 300 हून अधिक विकेट घेणाऱ्या महान कपिल देव नंतर झहीर हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. झहीर 2003, 2007 आणि 2011 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता. त्याने भारताकडून 200 वनडे आणि 92 कसोटी सामने खेळले. क्रिकेटच्या सर्वात लांब स्वरूपात त्याच्या नावावर 3 अर्धशतकही आहेत.