Happy Birthday Sachin Tendulkar: 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर याचे 'हे' 5 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड फलंदाजांना करावा लागणार कठोर परिश्रम
सचिनला देव मानणाऱ्या देशातील कोट्यावधी क्रिकेट प्रेमींसाठी 24 एप्रिलचा दिवस हा उत्सव पेक्षा काही कमी नाही. 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सचिनचे असे अनेक रेकॉर्डस् आहेत जे तोडणे पुढील किंवा सध्याच्या पिढीसाठी जवळजवळ अशक्य आहे. त्यांना सचिनचे हे रेकॉर्ड मोडण्यासाठी कठोर परिश्रमही करावा लागेल.
'क्रिकेटचा देव' म्हणजेच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा आज 47 वा वाढदिवस आहे. सचिनला देव मानणाऱ्या देशातील कोट्यावधी क्रिकेट प्रेमींसाठी 24 एप्रिलचा दिवस हा उत्सव पेक्षा काही कमी नाही. याच दिवशी सचिनचा जन्म 1973 मध्ये झाला होता. जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू फलंदाज म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकर याने अगदी लहान वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि एकेकाळी सर्वात छोट्या वयात कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या विक्रमचीही नोंद केली. भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार मिळवणारा तो देशातील पहिला खेळाडू आहे. 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सचिनने अनेक विक्रमांची नोंद केली. त्यापैकी बरेच रेकॉर्ड मोडले ही गेले, परंतु असे अनेक रेकॉर्डस् आहेत जे तोडणे पुढील किंवा सध्याच्या पिढीसाठी जवळजवळ अशक्य आहे. त्यांना सचिनचे हे रेकॉर्ड मोडण्यासाठी कठोर परिश्रमही करावा लागेल. (सचिन तेंडुलकर ने घेतला मोठा निर्णय, कोविड-19 वॉरियर्सच्या सन्मानार्थ 47 वा वाढदिवस नाही करणार साजरा)
सध्या सचिनचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्डस् मोडण्याची विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, रोहित शर्मा इतकच नाही तर महिला खेळाडूंनीही तयारी दर्शवित आहेत. मात्र, 'हे' 5 रेकॉर्ड मोडण्यासाठी फलंदाजांना नक्कीच कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. पाहा:
1. सर्वाधिक 200 टेस्ट
सचिनने आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरूवात 1989 मध्ये केली आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 24 वर्षांच्या कारकीर्दीत सचिनने 200 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. सध्या खेळणाऱ्या क्रिकेटर्स पैकी इंग्लंडचे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी 151 आणि 138 टेस्ट सामने खेळले आहेत. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी त्यांना आपली फिटनेस टिकवून भरपूर मेहनत करावी लागणार आहे.
2. सर्वाधिक वर्ल्ड कप
सचिन तेंडुलकर 6 वेळा वर्ल्ड कप खेळला आहे. असा पराक्रम करणे खूप अवघड आहे. बर्याच खेळाडूंना फक्त 3-4 विश्वचषक खेळायला मिळते. अशा स्थितीत सचिन 6 वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये झळकला आहे. विराट कोहली आजवर 3 वर्ल्ड कप स्पर्धा खेळला आहे.
3. टेस्ट क्रिकेटमध्ये 51 शतक
सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये 51 कसोटी शतकं झळकावली आहेत. या यादीमध्ये पहिले दहा खेळाडू निवृत्त झाले आहेत. विराट कोहलीने 27 आणि स्टीव्ह स्मिथने 26 शतकं ठोकली आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी त्यांना बरेच कसोटी सामने खेळावे लागतील आणि चमकदार कामगिरी करावी लागेल.
4. क्रिकेटमध्ये 34 हजाराहून अधिक धावा
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. ज्याला तोडणे फार कठीण आहे. कोणतेही खेळाडू त्याच्या आजूबाजूला नाहीत. विराट कोहलीने आतापर्यंत 18 हजार धावा केल्या आहेत. जर त्याला सचिनचा विक्रम मोडायचा असेल तर त्याला सतत क्रिकेट खेळावे लागेल.
5. सर्वाधिक टेस्ट धावा
सचिनने आंतरराष्ट्रीय टेस्ट करिअरमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. 86 सामन्यात कोहलीने 7240 धावा केल्या असून ही संख्या पार करण्यासाठी विराटसाठी मुश्किल दिसत आहे. भारत तितकी कसोटी सामने खेळत नसल्याने धावांची भूक असतानाही कोहली या जादूई संख्या पार करेल असं दिसत नाही.
सचिनने 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि डॉन ब्रॅडमननंतर सर्वात महान फलंदाज ठरला. 200 टेस्ट, 100 आंतरराष्ट्रीय शतकं सचिनच्या नावर असे अनन्य रेकॉर्डस् आहेत जे मोडणे सध्याच्या क्रिकेटपटूंसाठी कठीण ठरणार आहे.