सचिन तेंडुलकर याने विनोद कांबळी याला Friendship Day च्या शुभेच्छा देत बाउंड्रीच्या नियमावरून ICC ची घेतली फिरकी, पहा Video

या व्हिडिओमध्ये सचिन आणि विनोद क्रिकेट व्हिडिओगेम खेळताना दिसत आहे. यावर आयसीसीच्या बाऊंड्रीच्या नियमाची फिरकी घेतली आहे.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी (Photo Credit: Getty Images and Twitter)

मित्र सर्वांच्या जीवनात आवश्यक असतात. कोणत्याही परिस्थितीत साथ निभावणाऱ्या मित्राचे आभार मानण्यासाठी संपूर्ण जग आज, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा करतो. क्रिकेटविश्वातील काही खेळाडूंनी आपल्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. क्रिकेटविश्वात केएल राहुल-हार्दिक पंड्या, एबी डिव्हिलियर्स-विराट कोहली यासारख्या क्रिकेटपटूंची मैत्री प्रख्यात आहे. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी (Vinod Kambli) यांचे देखील नाव शामिल आहे. आज फ्रेंडशिप डे निमित्ताने सचिनने ट्विटर द्वारे आपल्या बाल मित्र कांबळी याला शुभेच्छा दिल्या. (Friendship Day 2019 च्या पूर्वसंध्येला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा; पहा फोटो)

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सचिनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन आणि विनोद क्रिकेट व्हिडिओगेम खेळताना दिसत आहे. या दोघांमधील हा पूर्ण गेम रेकॉर्ड केला गेलाय. विनोद 28 धावा करतो. त्यानंतर सचिन देखील फक्त 28 धावाच करू शकतो. आणि दोघांमधील सामने टाय होतो. यानंतर कांबळी सुपर-ओव्हर खेळण्याचा सुझाव देतो. यावर आयसीसीच्या (ICC) बाऊंड्रीच्या नियमाची फिरकी घेत सचिन म्हणतो की सुपर-ओव्हर नाही होणार, कारण मैत्रीची काही सीमा (बाउंड्री) नसते. यानंतर मास्टर ब्लास्टर म्हणतो की, 'समजणाऱ्याला इशारा काफी आहे.' पहा हा व्हिडिओ इथे:

14 जुलैला इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात झालेल्या क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये दोन्ही संघातील सामना टाय झाला होता. त्यानंतर सुपर-ओव्हर खेळण्यात आली आणि ती देखील टाय झाली. आणि इंग्लंडला सर्वाधिक बाउंड्रीच्या आधारावर विजयी घोषित करण्यात आले. आयसीसीच्या या नियमाची चहुबाजूने टीका करण्यात आली. शिवाय अनेकांनी यावर अन्य पर्याय देखील सुचवले.