सचिन तेंडुलकर याने वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवत शेअर केला Jofra Archer चा वर्ल्डकप 2019 मधील अंतिम सामन्यातील सुपर ओव्हरचा व्हिडिओ (Watch Video)
गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा आणि सर्व किक्रेटप्रेमींचा लाडका सचिन तेंडुलकर याने सोशल मीडियावर वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवत एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 च्या अंतिम सामन्यातील आहे.
गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा आणि सर्व किक्रेटप्रेमींचा लाडका सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने सोशल मीडियावर वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवत एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 (ICC Cricket World Cup 2019) च्या अंतिम सामन्यातील आहे. 2019 मध्ये क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात पार पडला होता. अटीतटीच्या या सामन्यात इंग्लंडचा कृष्णवर्णीय गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने सुपरओव्हर (Super Over) टाकत इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. हा व्हिडिओ यापूर्वी ICC ने शेअर करत म्हटले होते, "विविधतेशिवाय क्रिकेट काहीच नाही. विविधतेशिवाय आपल्याला संपूर्ण चित्र कळत नाही."
सचिन तेंडुलकर याने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत नेल्सन मंडेला यांचा एक विचार मांडला आहे. "खेळामध्ये जगाला बदलण्याची क्षमता आहे. खेळामध्ये जगाला एकत्र आणण्याची ताकद आहे आणि अशी ताकद खूप गोष्टींमध्ये असते." (George Floyd Killing: जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूने वेस्ट इंडीज स्टार क्रिस गेल संतापला, क्रिकेटमधील काळा-पांढरा भेदभावाचा केला खुलासा)
सचिन तेंडुलकर ट्विट:
जगभरातील विविध क्रीडापटू यांनी Black Lives Matter या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेतील 46 वर्षीय कृष्णवर्षीय जॉर्ज फ्लाइड याच्या मृत्यूच्या घटनेनंतर संपूर्ण अमेरिकेमध्ये Black Lives Matter या आंदोलनाला सुरुवात झाली. वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने आयसीसीला वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आयसीसीने वर्ल्डकप 2019 च्या अंतिम सामन्याचा व्हिडिओ शेअर केला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)