2011 वर्ल्डकप च्या आठवणींना 'सचिन तेंडुलकर'ने दिला उजाळा; 2019 World Cup साठी भारतीय क्रिकेट संघाला दिल्या शुभेच्छा (Watch Video)
क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज त्याच जुन्या आठवणींना उजाळा देत भारतीय क्रिकेट संघाला(Indian Cricket Team) शुभेच्छा दिल्या आहेत.
2 एप्रिल हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहणार्या एका दिवसांपैकी आहे. आठ वर्षांपूर्वी भारताने श्रीलंकेविरूद्ध (Sri Lanka) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) वर्ल्डकप जिंकला होता. क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज त्याच जुन्या आठवणींना उजाळा देत भारतीय क्रिकेट संघाला(Indian Cricket Team) शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन तेंडुलकरच्या शुभेच्छा
सचिन तेंडुलकरने 2 एप्रिल 2011 ला भारताने वर्ल्डकप जिंकणं हा क्षण माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस होता. असं म्हटलं आहे. 'केवळ क्रिकेट करियरमधील नव्हे तर माझ्या आयुष्यामधीलसुद्धा हा दिवस मोठा आहे. या दिवसाचा आनंद शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. ' अशा शब्दांत त्याने मनातील भावना मोकळ्या करत यंदाच्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. Indian Cricket Team 2019 Schedule: नव्या वर्षात कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक?
वर्ल्डकप दर चार वर्षांनी येतो. यंदा जून महिन्यापासून इंग्लंडमध्ये वर्ल्डकपचे सामने रंगणार आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट संघात कोणाला संधी मिळणार ती नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सध्या मजबूत स्थितीमध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्डकपवर नाव कोरण्याची संधी आहे. त्यासाठी भारतीय खेळाडूंच्या पाठीशी सारे भारतीय उभे असतील असे सचिन तेंडुलकर म्हणाला आहे.
भारताचा पहिला सामना 5 जून दिवशी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आहे.