Happy Birthday Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 23 वर्षाच्या करिअरमधील पाच सर्वोत्कृष्ट सामने

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर Photo credit: PTI

Sachin Tendulkar 46th Birthday: जगभरात क्रिकेट (Cricket) हा नुसता खेळ नसून एक धर्म मानला जात असताना सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) केवळ खेळाडू नाही तर क्रिकेटचा देव (God Of Cricket) म्हणून ओळखलं जातं. आजवर अनेक महान क्रिकेटर होऊन गेले असले तरी सचिनची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये कायम आहे.अशा या मास्टर ब्लास्टरचा 24 एप्रिलला वाढदिवस  ( Sachin Tendulkar Birthday) असून सध्या सोशल मीडियावर त्याच्या फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे.

वयाच्या 16व्या वर्षी सुरु केलेल्या करिअरमध्ये सचिनला भारतातील सर्व मोठ्या खेळाडूंसोबत सामने खेळण्याची संधी मिळाली आणि आपल्या अफलातून खेळीने सचिनने या प्रत्येक संधीचं सोनं केलं आहे. शेकडो सामन्यांमधून शतकाचं शतक साधणाऱ्या सचिनच्या 23 वर्षाच्या करिअरमधील या पाच महत्वाच्या ओडीआय (ODI) सामन्यांनबद्दल जाणून घेऊयात.. Happy Birthday Sachin: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर करणार 46व्या वर्षात पदार्पण, सोशल मीडियावर फॅन्स असा साजरा करणार वाढदिवस

1) (India vs Australia) शारजाह, 1998

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात समोर 276 धावांचे आवाहन पेलत भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी विजय मिळवणं आवश्यक होतं. आधीच एका मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया कडून पराभूत झालेल्या टीम इंडिया साठी या मॅच मध्ये लिटल मास्टर सचिन तेंडुलकर हा हुकुमी एक्का सिद्ध झाला. 143 धावांची मोठी खेळी खेळत सचिनने ऑस्ट्रेलियन टीमला सळो की पळो करून सोडलं होतं.

(India vs Australia) शारजाह, 1998

2)(India vs South Africa) ग्वालियर, 2010 

वन डे इंटरनॅशनल सामन्यामधील सईद अन्वर या खेळाडूचा 194 रनांचा, साधारण 13 वर्ष अबाधित राहिलेला रेकॉर्ड मोडत सचिनने दुहेरी शतक साधलं होतं. सचिनने या खेळीत तब्बल 25 चौकार व 3 षटकार लावून भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा सहभाग दर्शवला होता. या नंतर वीरेंदर सेहवाग, रोहित शर्मा या खेळाडूंनी देखील दुहेरी शतक आपल्या नावावर केलं असाल तरीही संचाची ही रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी आजही सर्वांच्या लक्षात आहे.

(India vs South Africa) ग्वालियर, २०१०

3)(India vs Australia) हैदराबाद ,2009

या मॅच मध्ये भारताचा अवघ्या तीन धावांनी पराभव झाला असला तरी सचिनच्या 140 बॉल्स मध्ये काढलेल्या 175 रन्स ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.19 चौकार आणि 4 षटकार लावून सचिनने संघाला विजयाच्या सीमेपर्यंत आणून देखील एकंदर परफॉर्मन्स मुळे टीम इंडियाला हार पत्करावी लागली होती.

(India vs Australia) हैदराबाद ,2009

4) (India vs Pakistan) सेन्चुरिअन, 2003

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचे क्रेझ पूर्वापार पाहायला मिळत असले तरी या मॅच मध्ये सचिनचा खेळ जास्त भाव खाऊन गेला. वकार युनिस (Wakar Yunis) ,वसीम अक्रम (Wasim Akram), शोएब अख्तर (Shoaib Akhtar) या धुरंधर गोलंदाजांच्या समोर 75 चेंडूंमध्ये केलेल्या 98 धावांचं भारत व पाकिस्तान दोन्ही देशातील रहिवाश्यांनी कौतुक केलं होत.आपल्या क्रिकेटच्या आठवणींबद्दल बोलताना सचिन नेहमीच या मॅचचा न चुकता उल्लेख करतो.

(India vs Pakistan) सेन्चुरिअन, 2003

5) (India vs Kenya) ब्रिस्टॉल, 1999

स्वतःच्या वडिलांच्या मृत्यू पश्चात देखील सचिननं हा सामना खेळून केनिया च्या विरुद्ध नाबाद 140 धावांची नोंद आपल्या नावे केली होती. आईच्या सांगण्यावर देशासाठी दुःख बाजूला सारत या सामन्यात सचिनने आपल्या खेळातून वडिलांना श्रद्धांजली वाहिली होती. 101चेंडूंमध्ये 140 रन्स काढत सचिनने मन ऑफ द मॅच चा किताब देखील पटकावला होता.

(India vs Kenya) ब्रिस्टॉल, 1999

सचिनने 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकर च्या नावाची हवा कायम आहे, हे मात्र नक्की!



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप