सचिन तेंडुलकर याने 47 वा वाढदिवसानिमित्त आईच्या आशीर्वादाने केली दिवसाची सुरुवात, मिळाली 'अमूल्य' गिफ्ट, पाहा Photo

आजच्या दिवसाची सुरुवात लिटिल मास्टरने त्याच्या त्याच्या आईकडून आशीर्वाद घेऊन केली. सचिनने ट्विटरवर वाढदिवसानिमित्त त्याच्या आईबरोबरचे दोन फोटो पोस्ट केले आणि सांगितले की विशेष दिवशी आपल्या आईकडून अमूल्य भेटवस्तू मिळाल्याचे सांगितले. त्याच्या आईने त्याला वाढदिवसानिमित्त गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती भेट म्हणून दिली.

सचिन तेंडुलकर आणि त्याची आई (Photo Credit: Twitter)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा आज वाढदिवस आहे. 'क्रिकेटचा देव' सचिन आज 47 वर्षाचा झाला, मात्र सचिनने कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिनने आपला वाढदिवस कोविड-19 (COVID-19) योद्धांच्या सन्मानार्थ साजरा न करण्याचा निर्णय घेतला, जे या आजाराविरूद्ध लढाईचे नेतृत्व करीत आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात लिटिल मास्टरने त्याच्या त्याच्या आईकडून आशीर्वाद घेऊन केली. सचिनने ट्विटरवर वाढदिवसानिमित्त त्याच्या आईबरोबरचे दोन फोटो पोस्ट केले आणि सांगितले की विशेष दिवशी आपल्या आईकडून अमूल्य भेटवस्तू मिळाल्याचे सांगितले. त्याच्या आईने त्याला वाढदिवसानिमित्त गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती भेट म्हणून दिली. देश समस्येने झगडत आहे हे पाहून सचिनने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असला तरी या विषाणूमुळे लॉकडाउनचा फायदा त्याला झाला आहे. तो त्याच्या वाढदिवशी कुटुंबासमवेत आहे. (Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांकडून सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या 'टन' भर शुभेच्छा!; नागरिकांना म्हटले 'स्ट्रेट घरी ड्राईव्ह करा')

"माझ्या दिवसाचा प्रारंभ माझ्या आईकडून आशीर्वाद घेऊन केला. गणपती बाप्पांचा फोटो तिने मला गिफ्ट केला. 'पूर्णपणे अनमोल'," सचिनने सोशल मीडियावर फोटो शेअर करून लिहिले. यापूर्वी एका सूत्राने सांगितले होते की, तेंडुलकरला असे वाटते की देश म्हणून उत्सव साजरे करणे योग्य नाही आणि कोरोना व्हायरसविरुद्ध जग लढत आहे ज्याने जागतिक पातळीवर विनाश केले आहे."

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सचिनने कबूल केले की लॉकडाउनमुळे कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाली. लॉकडाउन दरम्यान तो स्वयंपाक करणे, घर स्वच्छ करणे आणि झाडांना पाणी देऊन मदत करत असल्याचे सचिनने सांगितले. सचिन म्हणाला की संध्याकाळीसुद्धा मुलांसाठी घरात राहणे फार कठीण आहे, कारण त्यांना नेहमीच आपल्या मित्रांशी भेटायचे असते, त्यांच्या सोबत फिरायला जायचे असते.

Happy Birthday Sachin Tendulkar: जाणून घेऊयात सचिनबद्द्ल काही इंटरेस्टिंग गोष्टी - Watch Video

तथापि, लॉकडाउनमुळे त्याला आणि त्याची पत्नी अंजली दोघांना अर्जुन आणि सारासह वेळ घालवायला मिळाला आहे. अशा स्थितीत त्याच्या आईलासुद्धा आपला मुलगा सचिनसोबत जास्त वेळ घालवायला मिळत आहे.