क्रिकेट विश्वातील खुन्नस; खेळाडूवृत्तीने घेतला 'बदला'; पाहा 'या' 5 अविस्मरणीय घटना

गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात एकमेकांवर वर्चस्व मिळवण्याची लढाई आणि एकमेकांना मागे टाकण्याच्या विचारामुळे दोघांमध्ये विवाद किंवा मतभेद निर्माण झाले आहे.

क्रिकेट विश्वातील खुन्नस (Photo Credit: YouTube)

प्रत्येक खेळाप्रमाणे क्रिकेटमधेही अनेकदा मैदानावर किंवा बाहेर खेळाडू किंवा त्याच्याशी निगडित लोकांमध्ये वाद-विवाद झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात एकमेकांवर वर्चस्व मिळवण्याची लढाई आणि एकमेकांना मागे टाकण्याच्या विचारामुळे दोघांमध्ये विवाद किंवा मतभेद निर्माण झाले आहे. बर्‍याच प्रसंगी अंपायर किंवा दुसऱ्या खेळाडूला मध्यस्थी करावी लागते. मैदानावरील कामगिरीद्वारे आपल्या प्रतिस्पर्ध्याला उत्तर देणे म्हणजे एकदिवसीय क्रिकेटपटूंनी त्यांच्या शैलीत मैदानात बदला घेणेच म्हणायला पाहिजे. आणि प्रेक्षकांनाही ते आवडते. खेळ प्रेमींसाठी क्रिकेट फक्त खेळ नाही, यात त्यांच्या भावनाही जोडल्या गेलेल्या आहेत. क्रिकेट म्हणजे केवळ धावा करणे, किंवा विकेट घेण्यापर्यंत मर्यादित नाही, त्यात रेकॉर्ड बनविणे, चाहत्यांची मनं जिंकणे आणि भावना व्यक्त करणे यापासून सर्व काही असते. (सचिन तेंडुलकर कसा बनला ओपनर; अजहरुद्दीनकडे केली होती विनवणी, खूप रोचक आहे मास्टर-ब्लास्टरची सलामी फलंदाज बनण्याची कहाणी)

या नोटवर आपण क्रिकेट इतिहासातील सर्व स्वरूपातील पाच सर्वात अविस्मरणीय 'बदलाच्या क्षणांवर' नजर टाकूया. जे कदाचित आजही क्रिकेट प्रेमींच्या लक्षात असेल.

आंद्रे नेल-एस श्रीसंत

2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्‍याच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीशांतच्या पाच विकेट्सने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तथापि, त्याने दुसऱ्याच मार्गाने स्वतःला लक्षात ठेवण्याची निवड केली. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 84 धावांवर ऑलआऊट केल्यावर जोहान्सबर्ग मधील सामन्यात आंद्रे नेल आणि श्रीशांत एकमेकांची चेष्टा करताना दिसले. त्यावेळी हा भारतीय खेळाडूही खूप तरुण होता आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता, पुढच्याच चेंडूवर श्रीशांतने फलंदाजीने जोरदार शॉट खेळत चेंडू सीमेच्या बाहेर पाठवला.

शोएब अख्तर - वीरेंद्र सहवाग

2004 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर वीरेंद्र सहवाग कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तिहेरी शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू होता. पण शोएब अख्तर सहवागला एकापाठोपाठ एक बाउन्सर टाकत होता. प्रत्येक बाउन्सरनंतर अख्तर सहवागला जाऊन त्याला हुक शॉट खेळण्याचे आव्हान द्यायचा. बाउन्सर येतच राहिले, मग एक वेळ असा होता जेव्हा सहवाग म्हणाला, "बॉल टाकतो की भीक मागतो".

युवराज सिंह-अँड्र्यू फ्लिंटॉफ

2007 टी -20 वर्ल्ड कपचा तो क्षण आजवर कोणीही क्रिकेट प्रेमी विसरू शकला नाही. चूक अँड्र्यू फ्लिंटॉफने केली आणि युवर गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला त्याची भरपाई करायला लागली. फ्लिंटॉफ युवराजसोबत विवाद करायाला लागला आणि युवराज मुळीच शांत राहणाऱ्यातला नव्हता. या दोघांमधील वादाची भरपाई युवीने ब्रॉडच्या ओव्हरमध्ये सलग सहा चेंडूवर षटकार मारून केली.

वेंकटेश प्रसाद-आमिर सोहेल

1992 वर्ल्ड कप सामन्यात भारत-पाकिस्तानच्या दोन खेळाडूंमध्ये जबरदस्त वाद पाहायला मिळालं. 287 धावांच्या प्रत्युत्तरात सोहेल फलंदाजी करत असताना प्रसादच्या चेंडूवर त्याने चौकार मारला आणि बॅटने सीमा रेषेकडे इशारा केला. मात्र, पुढील चेंडूवर वेंकीने सोहेलला बोल्ड केले आणि रागात 'घरी जा' म्हणाला.

सचिन तेंदुलकर-अब्दुल कादिर

16 वर्षीय सचिन जेव्हा पाकिस्तान दौऱ्यावर गेला होत्या तेव्हा त्याचा सामना अब्दुल कादिरशी झाला. जेव्हा कादिर गोलंदाजीसाठी आले तेव्हा सचिनला आव्हान देताना ते म्हणाले की, "लहान मुलांना का मारत आहे? आमहालाही मारून दाखव. सचिनने पहिले हसून याला प्रत्युत्तर दिले आणि त्यानंतर बॅटने उत्तर दिले. कादिरच्या पहिल्या चेंडूवर सचिनने षटकार ठोकला आणि अखेरीस ओव्हरमध्ये त्याने एकूण चार षटकार ठोकले.

क्रिकेटच्या मैदानावर असे अनेक किस्से आहेत जेव्हा बॉलर आणि फलंदाज आमने-सामने आले. काही वेळा फलंदाज तर कधी गोलंदाजाने वर्चस्व गाजवले.