2024 लोकसभा निवडणुक लढवणार एस श्रीसंत, तिरुअनंतपुरम मतदारसंघातून शशी थरूर यांना पराभूत करण्याची इच्छा
2016 मध्ये त्याने केरळ विधानसभेच्या तिरुअनंतपुरम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती परंतु तिथे त्याचा पराभव झाला होता.
आपल्या छोट्याश्या कारकीर्दीत गंभीर वादात सापडलेला भारताचा वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंत (S Sreesanth) आयपीएल स्पॉट फिक्सिंग (IPL Spot Fixing) च्या आरोपांना मागे टाकून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. श्रीसंत पुन्हा एकदा केरळ रणजी संघाकडून खेळण्यासाठी सज्ज आहे आणि त्यासाठी जो जोरदार प्रयत्नदेखील करीत आहेत. यादरम्यान, श्रीसंतने 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही त्यांचे लक्ष केंद्रित केले आहे. 2016 मध्ये त्याने केरळ विधानसभेच्या तिरुअनंतपुरम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती परंतु तिथे त्याचा पराभव झाला होता आणि आता पुन्हा एकदा श्रीसंतचे तिरुअनंतपुरम लोकसभा मतदार संघाकडे लक्ष आहे. गेल्या तीन वेळेस या जागेवर कॉंग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) विजयी होत आहेत. (आयपीलएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात BCCI शांत; श्रीशांत याच्यावरील आजीवन बंदी हटवून 7 वर्षांवर आणली)
इंडियन एक्सप्रेसशी झालेल्या संभाषणात श्रीसंत यांनी हे स्पष्ट केले की त्याला 2024 लोकसभा निवडणुका लढवायच्या आहेत आणि थरूर यांना भाजपा उमेदवार म्हणून पराभूत करायचे आहे. श्रीसंत म्हणाला की, "मला व्यक्तिशः शशी थरूर खूप आवडतात. त्यांनी वाईट काळातही मला पाठिंबा दर्शविला, परंतु तिरुअनंतपुरममध्ये मी त्यांना पराभूत करणार यात काही शंका नाही." जा मतदार संघावर बर्याच दिवसांपासून भाजपाचे लक्ष लागले आहे. 2014 लोकसभा निवडणुकीदरम्यान थरूर फक्त 10 हजार मतांनी विजयी झाले होते, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत थरूर यांच्या विजयात जवळपास एक लाख मतांच्या जवळपास वाढ झाली.
दुसरीकडे, आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमुळे 2013 रोजी बीसीसीआयच्या शिस्त समितीने श्रीसंतवर क्रिकेट खेळण्यासाठी आजीवन बंदी घातली होती, परंतु मागील महिन्यातच बीसीसीआयने श्रीसंतवरील बंदी सात वर्षांवर आणली. त्याच्यावरील बंदी ऑगस्ट 2020 मध्ये संपेल. 2007 दक्षिण आफ्रिकेतील टी-20 आणि 2011 मध्ये 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकणार्या दोन भारतीय संघाचा श्रीसंत भाग होता. 2011 मध्ये श्रीलंकाविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.