Maharashtra Premier League: महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यादरम्यान रुतुराज गायकवाड अनपेक्षीत धावबाद; Run-Out होतानाचा Video Viral

महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra Premier League) दरम्यान रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) आणि पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यात कर्णधार रुतुराज गायकवाड हा अगदी अनपेक्षीत पद्धतीने धावबाद (Ruturaj Gaikwad-s Unusual Run-Out) झाला. पहिल्या डावाच्या 12व्या षटकात ही घटना घडली ज्यामुळे डावालाच वेगळे वळण मिळाले.

Ruturaj-Gaikwad-Run-Out | (Photo Credit - X)

महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra Premier League) दरम्यान रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) आणि पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यात कर्णधार रुतुराज गायकवाड हा अगदी अनपेक्षीत पद्धतीने धावबाद (Ruturaj Gaikwad-s Unusual Run-Out) झाला. पहिल्या डावाच्या 12व्या षटकात ही घटना घडली ज्यामुळे डावालाच वेगळे वळण मिळाले. पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार असलेल्या गायकवाड याचा धावबाद होतानाचा मैदानावरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो नेमका कसा बाद झाला याबातबत पाहायला मिळते. व्हिडिओ पाहून त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. असे असले तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचाच खेळ आहे यावर पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाले आहे.

पंचांनाही नव्हती खात्री

पुणेरी बाप्पाचे नेतृत्व करणाऱ्या रुतुराज गायकवाडने दोन चोरट्या धावा घेण्याची जोखमी उचलली. वास्तविक पाहता तो अनुभवी आणि कसलेला खेळाडू असल्याने त्याने ही जोखीम उचलली यात काही विशेष नव्हते. मात्र, त्याची वेळ चुकली. क्षेत्ररक्षणावर असलेल्या रत्नागिरी जेट्सच्या खेळाडूच्या हातातच चेंडू असतानाही त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. सहाजिकच खेळाडूने यष्टीरक्षकाकडे चेंडू फेकला. काहीच क्षणांच्या या कालावधीत रुतुराज क्रिझपर्यंत पोहोचला. त्याने बॅटने क्रीझची कड पकडलीही. पण त्याचा पाय हवेत असतानाच बॅट उचलली गेली. इतक्यात समोरुन आलेला चेंडू थेट यष्ट्यांवर आदळला. परिणाम व्हायचा तोच झाला. तो धावबाद झाला. खरे तर मैदानावर असलेल्या पंचालाही रुतुराज बाद झाल्याची खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. तिसऱ्या पंचानेही तंत्रज्ञानाचा वापर करत शोध घेतला आणि घटनेतील वास्तविकता समजून घेतली. ज्यामध्ये रुतुराज बाद झाला. (हेही वाचा, Ruturaj Gaikwad, MPL 2023: पत्नीच्या नंबरची जर्सी घालून ऋतुराज गायकवाड उतरला मैदानात, 5 षटकारांच्या जोरावर ठोकल्या 64 धावा)

रुतुराजनंतर पुणेरी बाप्पाची मैदानावर मोठी पडझड

दरम्यान, गायकवाड बाद झाल्यामुळे 15 चेंडूत 29 धावांवर त्याचा आश्वासक डाव संपुष्टात आला. परिणामी संघर्ष करणाऱ्या पुणेरी बाप्पा संघावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला. तत्पूर्वी, पुणेरी बाप्पाने नील गांधीला लवकर गमावले होते, आणि इतर फलंदाजांनी धावसंख्या वाढवण्यासाठी धडपड केली. पण त्याला मर्यादा आल्याच. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना गायकवाडने जिद्द दाखवली होती, पण त्याचे प्रयत्न अल्पजीवी ठरले. त्याच्या बाहेर पडल्यानंतर संघाने विकेट गमावणे सुरूच ठेवले. राहुल देसाई आणि सचिन भोसले यांनी डाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पूर्ण फायदा मिळवता आला नाही. सत्यजीत बच्छावच्या अप्रतिम गोलंदाजीच्या कामगिरीने, चार बळी आणि विजय पावलेच्या दोन विकेट्सने पुणेरी बाप्पाला 148 धावांत रोखले.

व्हिडिओ

रत्नागिरी जेट्सचा पाठलाग करताना, धीरज फटांगरेने सुरुवातीच्या पराभवानंतरही एक बाजू लावून धरली. त्यानंतर कर्णधार अझीम काझी आणि निखिल नाईक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. काझीने 28 चेंडूत 31 धावा केल्या आणि नाईकने 22 चेंडूत 27 धावा करून नाबाद राहिले. योगेश चव्हाण (सात चेंडूत 17 धावा) आणि बच्छाव (सहा चेंडूत 17 धावा) यांच्या योगदानामुळे जेट्स संघाने केवळ दोन चेंडू शिल्लक असताना रोमहर्षक विजय निश्चित केला. या विजयाने रत्नागिरी जेट्सचे पॉइंट टेबलमधील अव्वल स्थान मजबूत केले आणि लीगमधील त्यांचे वर्चस्व अधोरेखित केले. याउलट, पुणेरी बाप्पाची धडपड सुरूच राहिली, त्यांना पाचव्या स्थानावर सोडले आणि स्पर्धेतील महत्त्वाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now