RR Vs MI 20th IPL Match 2020: मुंबई इंडियन्सच्या संघाने टॉस जिंकला; राजस्थान रॉयल्स प्रथम गोलंदाजी करणार
आयपीएल 2020 च्या 12व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टॉस जिंकून राजस्थान रॉयलच्या (Rajastan Royals) संघाला प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आबूधाबी येथील शेख जायद मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. दुबई आंतराष्ट्रीय मैदानाच्या तुलनेत शेख जायद स्टेडिअम लहान आहे. यामुळे या मैदानात षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ आणखी एका विजयाकडे वाटचाल करणार आहे. तर, मागील सलग दोन सामन्यात मिळालेल्या पराभवाची जखम भरून काढण्यासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरणार आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- Most Catches as Wicketkeeper in IPL: आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर; अव्वल स्थानी कोण? घ्या जाणून
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), रियान पराग, महिपाल लोमरोर, टॉम करन, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, वरुण आरोन
मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर, ट्रेंट बाउल्ट, जसप्रीत बुमराह
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)