Video: रोहित शर्मा याची 'सुपरमॅन' उडी, जबरदस्त कॅच पकडत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल याला केले बाद

टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा ने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात मार्टिन गप्टिल याच्या शानदार कॅच पकडतयजमान संघाच्या सलामी फलंदाजाचा संपुष्टात आणला. रोहितने शिवम दुबेच्या चेंडू सीमारेषेजवळ हवेत झेप घेतली आणि गप्टिलला कॅच आऊट केले.

रोहित शर्माने घेतला स्मार्ट कॅच (Photo Credits: Twitter)

टीम इंडियाचा (India) 'हिटमॅन' रोहित शर्मा (Rohit Sharma) ने न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात मार्टिन गप्टिल (Martin Guptill) याच्या शानदार कॅच पकडतयजमान संघाच्या सलामी फलंदाजाचा संपुष्टात आणला. रोहितने शिवम दुबेच्या (Shivam Dube) चेंडू सीमारेषेजवळ हवेत झेप घेतली आणि गप्टिलला कॅच आऊट केले. गुप्टिल 19 चेंडूत 30 धावांवर बाद झाला. गप्टिलने न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरो याच्या साथीने टॉस गमावल्यावर पहिले फलंदाजी करत चांगली सुरुवात करून दिली आणि 8 ओव्हरमध्ये पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. पण शिवमच्या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेने षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात रोहितच्या शानदार फिल्डिंगचा बळी पडला आणि पॅव्हिलियनमध्ये परतला. भारतीय संघाला विकेटची नितांत आवश्यकता असताना भारतीय उपकर्णधार रोहितने हा झेल पकडला. त्यावेळी न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडची पहिली विकेट 7.5 षटकांत 80 धावांवर पडली. (IND vs NZ 1st T20I: कॉलिन मुनरो, केन विल्यमसन यांची धडाकेबाज बॅटिंग; न्यूझीलंडचे टीम इंडियाला 204 धावांचे लक्ष्य)

न्यूझीलंडने टॉस गमावल्यावर पहिले फलंदाजी करत 5 विकेट गमावून 203 धावा केल्या. दोन्ही देशातील पाहिला सामना ऑकलँडच्या इडन पार्कवर खेळला जात आहे. रोहितने बाऊंड्री लाइनवर कॅच घेतला,या मात्र एकदा असे वाटले की या चेंडूवर न्यूझीलंडला सहा धावा मिळतील, पण रोहितने त्याला तोल सांभाळला आणि टीम इंडियाला पहिली विकेट मिळाली. गुप्टिलने 19 चेंडूत 30 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने चौकार आणि एक षटकार लगावला. पाहा हा व्हिडिओ:

मुनरोने 42 चेंडूत 59 धावा केल्या. न्यूझीलंडने 20 षटकांत पाच गडी बाद 203 धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसन ने 51 तर रॉस टेलर ने नाबाद 54 धावा केल्या. जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, शिवम दुबे यांनी भारताकडून प्रत्येकी 1 विकेट घेतली. मोहम्मद शमीने सर्वाधिक 53 धावा लुटवल्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now