Rohit Sharma On Hardik Pandya: रोहित शर्माने उघड केला हार्दिक पांड्याला ‘किस’ करण्यामागचा राज, दिलखेचक उत्तराने जिंकले चाहत्यांचे मन
आयपीएल 2024 च्या सुरुवातीला रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील संबंध बिघडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मुंबई इंडियन्स संघातील नेतृत्वबदलानंतर पंड्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. मैदानात त्याच्यावर टीका झाली आणि चाहतेही नाराज होते. मात्र, T20 World Cup 2024 मध्ये हे दोघंही Team India साठी एकत्र आले आणि कमालीचा परफॉर्मन्स दिला.
T20 World Cup 2024 अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक भावनिक आणि संस्मरणीय क्षण ठरला जेव्हा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने अष्टपैलू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) मैदानावर किस केले. हा क्षण केवळ विजयाचा नव्हता, तर दोन दिग्गज क्रिकेटपटूंमधील नात्याचा पुनर्जन्म होता. त्याआधी, आयपीएल 2024 च्या सुरुवातीला रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील संबंध बिघडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मुंबई इंडियन्स संघातील नेतृत्वबदलानंतर पंड्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. मैदानात त्याच्यावर टीका झाली आणि चाहतेही नाराज होते. मात्र, T20 World Cup 2024 मध्ये हे दोघंही Team India साठी एकत्र आले आणि कमालीचा परफॉर्मन्स दिला.
हार्दिक माझा मुख्य खेळाडू आहे - रोहितचं प्रेमळ वक्तव्य
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात हार्दिकने जबरदस्त गोलंदाजी करत भारताला विजयी क्षण मिळवून दिला. त्यानंतर रोहित आणि हार्दिक दोघेही भावनिक झाले. हाच क्षण जिओहॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्मा ने उलगडला. रोहित म्हणाला 'तो खूप भावनिक क्षण होता. हार्दिक माझा मुख्य खेळाडू आहे. त्याने माझ्यासाठी आणि संघासाठी खूप मेहनत केली आहे. जर तो नसता, तर आज आपल्याकडे ही ट्रॉफी नसती,' असं रोहितने स्पष्ट केलं.
हार्दिक पंड्या बनतोय टीम इंडियाचा मॅच विनर
T20 World Cup 2024 नंतर हार्दिक पंड्याने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करत भारताला पुन्हा विजयी केलं. जरी तो टीम इंडियाचा पुढचा कर्णधार न बनू शकला, तरी तो सध्या संघातील महत्त्वाचा मॅच विनर मानला जातो. तसेच, या दोन प्रमुख आयसीसी स्पर्धांमधील कामगिरीनंतर रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील संबंध अधिकच दृढ झाले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2025 10:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

