Rohit Sharma ODI Sixes: षटकार मारण्यात 'हिटॅमन' रोहित शर्मा पोहचला ख्रिस गेलच्या बरोबरीत, आता शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडणार!
भारताकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) डावाच्या सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केली. मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. तरीही त्याने एका विशिष्ट बाबतीत ख्रिस गेलची (Chris Gayle) बरोबरी केली आहे.
मुंबई: श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा 110 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारतासाठी गोलंदाज आणि फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. या कारणामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने तिसरी वनडे गमावताच मालिकाही 2-0 अशी गमावली. भारताकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) डावाच्या सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केली. मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. तरीही त्याने एका विशिष्ट बाबतीत ख्रिस गेलची (Chris Gayle) बरोबरी केली आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma Joins Unwanted List: श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या नको असलेल्या क्लबमध्ये रोहित शर्माचे नाव, 27 वर्षानंतर झाला हा घात)
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ठोकले 331 षटकार
रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 20 चेंडूत 35 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 1 षटकार होता. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी वनडे क्रिकेटमध्ये 331-331 षटकार ठोकले आहेत. आता फक्त पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी रोहितच्या पुढे आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 351 षटकार मारले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो खेळाडू आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
शाहिद आफ्रिदी- 351
रोहित शर्मा-331
ख्रिस गेल- 331
सनथ जयसूर्या- 270
एमएस धोनी- 229
इऑन मॉर्गन-220
अशी कामगिरी करणारा ठरला तो चौथा भारतीय फलंदाज
रोहित शर्माने 35 धावांची इनिंग खेळून श्रीलंकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये दोन हजारहून अधिक धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि महेंद्रसिंग यांनी ही कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकरने भारताकडून श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 3113 धावा केल्या आहेत.
श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज:
सचिन तेंडुलकर- 3113
विराट कोहली- 2652
महेंद्रसिंग धोनी- 2383
रोहित शर्मा- 202