टीम इंडियातील ‘हे’ 5 स्टार क्रिकेटपटू आहेत ‘या’ पाच श्रीमंत कुटुंबांचे जावई

मैदाना व्यतिरिक्त क्रिकेटपटू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतात विशेषतः त्यांची पत्नी आणि गर्लफ्रेंडबाबत अनेकदा चर्चा रंगते. या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी फक्त सुंदरच नाही तर श्रीमंत कुटुंबाशी संबंधित असतात. आज आपण अशाच भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत जे एका मोठ्या घराण्याचे किंवा श्रीमंत घराण्याचे जावई आहेत.

चेतेश्वर पुजारा-पूजा पबरी आणि रवींद्र जडेजा-रिवा सोलंकी (Photo Credit: Instagram)

जगभरातील क्रिकेटपटूंचे करोडो चाहते आहेत. मैदाना व्यतिरिक्त क्रिकेटपटू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतात विशेषतः त्यांची पत्नी आणि गर्लफ्रेंडबाबत अनेकदा चर्चा रंगते. या भारतीय क्रिकेटपटूंच्या (Indian Cricketers) पत्नी फक्त सुंदरच नाही तर श्रीमंत कुटुंबाशी संबंधित असतात. भारतीय संघात (Indian Cricket Team) देखील असे अनेक खेळाडू आहे ज्यांची पत्नी श्रीमंत कुटुंबातून आलेल्या आहेत. भारतीय संघाचे नियमित सदस्य असो किंवा आयपीएल फ्रँचायझी संघाचे सदस्य क्रिकेटपटूंवर पैशांचा वर्षाव होताना अनेकदा पहिले गेले आहे. तथापि आज आपण अशाच भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत जे एका मोठ्या घराण्याचे किंवा श्रीमंत घराण्याचे जावई आहेत. (CSK vs RCB IPL 2021 Match 19: Ravindra Jadeja ने Harshal Patel च्या एका ओव्हरमध्ये केला 5 षटकारांचा वर्षाव, युनिव्हर्स बॉसच्या विक्रमाची केली बरोबरी)

1. रोहित शर्मा

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित आणि रितिका सजदेह 2015 मध्ये लग्नबेडीत अडकले. रितिका एका श्रीमंत कुटुंबातील असून तिचे वडील बॉबी सजदेह मुंबईच्या पॉश कफ परेड भागात राहत असून ते एक प्रसिद्ध बिल्डर आहेत. रितिकाचा भाऊ बंटी सजदेह सेलिब्रिटी मॅनेजर आहे. शिवाय, रितिका स्वतः सेलिब्रिटी मॅनेजर आहे आणि तिने क्रिकेटच्या बऱ्याच स्टार खेळाडूंसोबत काम केके आहेत ज्यादरम्यान रोहित व ती प्रेमात पडले.

2. रवींद्र जडेजा

सध्याच्या भारतीय संघाचा सर्वोत्तम अष्टपैलू रवींद्र जडेजा 2016 मध्ये रीवा सोलंकी सोबत विवाह बंधनात अडकला होता. रीवा मॅकेनिकल इंजिनियर असून ती गुजरातच्या प्रसिद्ध राजकीय कुटुंबातून येते. ती कॉंग्रेसचे राजकारणी हरिसिंग सोलंकी यांची भाची असून तिचे कुटुंब गुजरातच्या सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक आहे.

3. हरभजन सिंह

भारतीय फिरकीपटू व बॉलीवूड अभिनेत्री गीता बसरा यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. गीताचे वडील राकेश बसरा हे इंग्लंडचे सुप्रसिद्ध व्यापारी असून त्यांची त्यांची वर्षाला जवळपास अब्जावधी रुपयांची कमाई होते असे समजले आहेत. शिवाय, गीताने स्वत: काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

4. इरफान पठाण

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने 2016 मध्ये सौदी अरेबियाची मॉडेल सफा बेगसोबत विवाह केला होता. तिचे वडील मिर्जा फारुख बेग जेद्दा शहरातील मोठे व्यापारी आहेत.

5. गौतम गंभीर

क्रिकेटला रामराम करून राजकीय खेळपट्टीवर कार्यरत असलेला गंभीर 2011 मध्ये नताशा जैन सोबत विवाहबंधनात अडकला. नताशाचे वडील दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आहेत. जैनचे वडील रवींद्र जैन दिल्लीचे मोठे टेक्सटाइल व्यापारी आहेत. त्याचबरोबर गंभीरची पत्नी नताशा देखील एक बिझिनेस वूमन आहे.