Rahul Dravid याच्या प्रशिक्षक पदावर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, ‘मिस्टर डिपेंडेबल’च्या Head Coach म्हणून नियुक्तीवर पहा काय म्हणाला ‘हिटमॅन’

रोहित म्हणाला की, खेळाडू राहुलसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मायदेशात आगामी न्यूझीलंड दौऱ्यावरून 48 वर्षीय द्रविड रवि शास्त्रींच्या जागी संघाचा पदभार सांभाळणार आहे.

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड (photo Credit: PTI)

टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) माजी कर्णधार आणि जबरदस्त फलंदाज राहुल द्रविडची (Rahul Dravid) राष्ट्रीय संघाच्या नवीन प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. रोहित म्हणाला की, खेळाडू राहुलसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मायदेशात आगामी न्यूझीलंड दौऱ्यावरून (New Zealand Tour) 48 वर्षीय द्रविड रवि शास्त्रींच्या जागी संघाचा पदभार सांभाळणार आहे. UAE मध्ये T20 विश्वचषक 2021 स्पर्धेनंतर शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असून स्पर्धेत भारताने बुधवारी अफगाणिस्तानचा पराभव करून पहिला विजय साजरा केला. सामन्यानंतरच्या सादरीकरण दरम्यान रोहित म्हणाला की, राहुलला नव्या फॉर्ममध्ये संघात सामील होताना पाहून मला खूप आनंद झाला आहे. “हे अधिकृत आहे का? आम्ही खेळ खेळत होतो, मला कल्पना नव्हती,” भारताच्या अफगाणिस्तानवर (Afghanistan) 66 धावांनी विजय मिळविल्यानंतर रोहित म्हणाला.  स्पर्धेत टीम इंडियाच्या पहिल्या विजयात रोहितने 47 चेंडूत 74 धावा केल्या. (राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, रवी शास्त्रीची जागा घेणार, BCCI ने पुष्टी केली)

“पुनरागमन, पण भारतीय संघात वेगळ्या क्षमतेने केल्याबद्दल त्याचे अभिनंदन. आम्ही त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. तो भारतीय क्रिकेटचा दिग्गज आहे. आणि भविष्यात त्याच्यासोबत काम करणे आनंददायी असेल,” रोहित म्हणाला. तसेच यापूर्वी द्रविड म्हणाला की तो संघात नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील होण्यास उत्सुक आहे. “शास्त्री यांच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी केली आहे आणि मला आशा आहे की ते पुढे नेण्यासाठी संघासोबत काम करेल. NCA, अंडर-19 आणि इंडिया ‘A’ सेटअपमध्ये बहुतेक मुलांसोबत काम केल्यामुळे, मला माहित आहे की त्यांच्यात दररोज सुधारण्याची आवड आणि इच्छा आहे,” बीसीसीआयने शेअर केलेल्या निवेदनात द्रविडने म्हटले आहे.

विश्वचषकानंतर भारतीय संघ 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून द्रविड पहिल्यांदा राष्ट्रीय संघासोबत काम करणार आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात शिखर धवनच्या नेतृत्वात संघासह द्रविडने श्रीलंका दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. तिथे भारतीय संघ मर्यादित षटकांची मालिका खेळला. द्रविड यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) संचालक होते. याशिवाय ते भारत अंडर-19 आणि इंडिया-अ संघांचे प्रशिक्षकही राहिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif