Rishabh Pant Injury Update: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या कधी फलंदाजी करणार

ती पहिल्या डावात अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाली. पण दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 231 धावा केल्या. विराटने 102 चेंडूंचा सामना करत 70 धावा केल्या आहेत.

Photo Credit- X

Rishabh Pant Injury Update: ऋषभ पंत टीम इंडियासाठी फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, तो आता सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो. पंत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पॅड घालून बसलेला दिसला.  (हेही वाचा  - Rishabh Pant Injured: टीम इंडियाला मोठा धक्का! जडेजाच्या बॉलवर ऋषभ पंत जखमी; गुडघ्याला दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले )

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने 3 गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि सर्फराज खान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता. पण कोहली आऊट झाल्यानंतर स्टंप घोषित करण्यात आले. त्यामुळे पंत फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. मात्र तो चौथ्या दिवशी फलंदाजीला येईल. ब्रेक दरम्यान त्याने सरावही केला. पंतला फलंदाजीत कोणतीही अडचण नाही.

पाहा व्हिडिओ -

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाने जोरदार पुनरागमन

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आहे. ती पहिल्या डावात अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाली. पण दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 231 धावा केल्या. विराटने 102 चेंडूंचा सामना करत 70 धावा केल्या आहेत. कोहलीने 8 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. सर्फराज खान 70 धावा करून नाबाद आहे. त्याने 78 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्याने 52 धावांची खेळी खेळली.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif