IND vs AUS 3rd Test 2024: ऋषभ पंतची गाबा कसोटीत चमकदार कामगिरी; 150 विकेट्सचा टप्पा गाठत घडवला इतिहास, धोनी-द्रविडच्या यादीत मिळवलं स्थान
आता पंत धोनी आणि द्रविडच्या यादीत सामील झाला आहे.
IND vs AUS 3rd Test 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS)बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा सामना खेळवला जात आहे. ब्रिस्बेनमधील गाबा येथे हा सामना खेळवला जात आहे. पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळात व्यत्यय आला. केवळ 13.2 षटकांचाच खेळ होऊ शकला. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर बुमराहने सुरूवातीलाच 2 विकेट्स घेतले. तर, ऋषभ पंतने ()चमकदार कामगिरी करत आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे. (हेही वाचा:IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Scorecard, Lunch Break: दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 3 गडी गमावून 104 धावा, जसप्रीत बुमराहने घेतल्या 2 विकेट, सामन्याचे स्कोअरकार्ड येथे पहा)
कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून विकेटच्या मागे सर्वाधिक झेल टिपणारा भारताचा चौथा खेळाडू ऋषभ पंत ठरला आहे. ऋषभ पंतने 41 सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे. त्यामुळे तो एमएस धोनी आणि राहुल द्रविड यांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने 150 विकेट्सचा टप्पा गाठला आहे.
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या दिवशी गोलंदाजीची सुरुवात केली. यासह बुमराहने स्पेलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात विकेट्स घेतले. बुमराहने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. बुमराहने 17 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला ऋषभ पंतकरवी झेलबाद करत पहिली विकेट मिळवली. ही विकेट घेतल्यावर ऋषभ पंतने मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. त्यानंतर आता पंतने य़ष्टीरक्षण करताना 150 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. ज्यामध्ये 135 झेल आणि 15 स्टंपिंगचा समावेश आहे.
सर्वाधिक फलंदाजांना बाद करणारे यष्टीरक्षक
एमएस धोनी (2005-14)
90 सामने
256 यष्टिरक्षक म्हणून झेल
38 स्टंपिंग
एकूण बाद: 294
सय्यद किरमाणी (1176-1986)
88 सामने
160 यष्टिरक्षक म्हणून झेल
38 स्टंपिंग
एकूण बाद: 198
ऋषभ पंत (2018-2024)
41 सामने
135 यष्टिरक्षक म्हणून झेल
15 स्टंपिंग
एकूण बाद: 150
किरण मोरे (1986-1993)
49 सामने
110 यष्टिरक्षक म्हणून झेल
20 स्टंपिंग
एकूण बाद: 130
माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत पहिल्या स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करताना धोनीने 90 सामन्यांमध्ये 294 एकूण फलंदाजांना बाद केलं, ज्यात 256 झेल आणि 38 स्टंपिंगचा समावेश आहे. याशिवाय राहुल द्रविडचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने 163 सामन्यात विकेट कीपिंग करताना 209 फलंदाजांना बाद केलं आहे.