Captains Who Couldn't Win A Test Match In India: अरे बाप रे! 'हे' 3 आक्रामक कर्णधार भारतामध्ये नाही जिंकू शकले एकही टेस्ट मॅच, नावं नक्कीच करतील हैराण

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 3 वर्ल्ड क्लास कर्णधार असे आहेत ज्यांना भारतात एकही टेस्ट मॅच जिंकता आली नाही आणि यांची नावं तुम्हाला देखील हैराण करतील.

रिकी पॉन्टिंग (Photo Credits: IANS)

Captains Who Couldn't Win A Test Match In India: भारतात कसोटी (India Test) क्रिकेट खेळताना कठीण परिस्थिती आणि खेळपट्टीचा सामना करावा लागत असल्यामुळे परदेशी संघांसाठी भारत नेहमीच कठीण टिम आहे. वेगवेळ्या परदेशी संघांनी अनेक वेळा भारताचा दौरा केला आहे, आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी यश मिळवले आहेत, पण व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाने नेहमीच बलाढ्य टीम इंडियाला (Team India) चांगलंच झुंजवलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मैदानावर खेळाडूंनी संयम दाखवणे एक मोठी परीक्षा असते आणि कोणत्याही कर्णधारासाठी या स्वरुपात यशस्वी होणे आणखी कठीण काम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये परदेशी भूमीवर यश संपादन करणे प्रत्येक देशासाठी मोठे आव्हान असते. काही खेळाडू यात यशस्वी ठरतात, तर काही खेळाडू बर्‍याच देशांत एकही विजय मिळवू शकत नाहीत. आज या लेखाच्यात आपण जाणून घेणार आहोत जगातील अशाच तीन महान कर्णधारांबद्दल ज्यांनी संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे, परंतु भारतामध्ये कसोटी विजयाची पाटी कोरीच राहिली. (Players Who Can Replace R Ashwin In India Test Team: टीम इंडियाच्या टेस्ट संघात रविचंद्रन अश्विनची जागा घेण्यासाठी 'हे' 3 फिरकीपटू आहेत मोठे दावेदार)

माइकल क्लार्क (Michael Clarke)

क्लार्कच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडविरुद्ध 2013-14 अ‍ॅशेस मालिकेत 5-0 क्लीन स्वीपच केला नाही तर वनडे वर्ल्ड कप विजेत्याचा मानही मिळवला. आता खेळातून निवृत्त झालेला क्लार्क त्याच्या चातुर्यासाठी प्रसिद्ध होता; तथापि, 2013 मध्ये त्याच्या नेतृत्वात भारत दौऱ्या दरम्यान कांगारू संघाला 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप पत्करावा लागला होता. स्वतः क्लार्कला त्या मालिकेदरम्यान भारताच्या काही रँक टर्नर्सविरुद्ध बॅटने संघर्ष करावा लागला होता.

स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming)

भारतातील क्रिकेटमधील कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून फ्लेमिंगची कामगिरी क्लार्कपेक्षा कितीतरी चांगली होती, तरीही कोणत्याही कसोटी सामन्यात तो विजयी होऊ शकला नाही. न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून फ्लेमिंगने अनुक्रमे 1999 आणि 2003 मध्ये भारतामध्ये कसोटी सामन्यांच्या संघाचे नेतृत्व केले. 1999 मध्ये 3-सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 1-0, तर 2003 मधील मालिका ड्रॉ झाली.

रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting)

खेळाच्या इतिहासातील पाँटिंग म्हणून दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा फक्त दुसरा कर्णधार आहे. तथापि, कसोटी कर्णधार म्हणून पोंटिंगचा भारतातील अत्यंत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्याने 2004 मध्ये पहिल्यांदा भारताच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. पहिल्या तीन सामन्यांसाठी पॉन्टिंग उपलब्ध नव्हता, मात्र चौथ्या सामन्यात त्याने नेतृत्वाची भूमिका स्वीकारली आणि योगायोगाने ऑस्ट्रेलियाने तो सामना गमावला. त्यानंतर पॉन्टिंगनंतर 2008 मध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात परतला आणि संघाला 2-0ने पराभव पत्करावा लागला. ही तीच मालिका होती ज्यात दोन भारतीय दिग्गज सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांनी क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर पॉन्टिंगने 2010 मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाचे 2 सामन्यांच्या कसोटी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आणि यंदाची चित्र बदलले नाही व संघाला क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले.