IPL 2021, SRH vs RCB: भुवनेश्वर कुमारने हिरावला बेंगलोरच्या तोंडातून विजयाचा घास, हैदराबादने अवघ्या 4 धावांनी विराट ‘आर्मी’ला लोळवले

हैदराबादने दिलेल्या 142 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बेंगलोरने 6 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 137 धावाच करू शकला. केन विल्यम्सनच्या नेतृत्वातील सनरायझर्सचा यंदाच्या आयपीएलमधील 13 सामन्यातील हा तिसरा विजय ठरला आहे.

सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 2021, SRH vs RCB: अबू धाबी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) केन विल्यम्सनच्या सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) अवघ्या चार धावांनी लोळवले आणि यंदाच्या स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली. हैदराबादने दिलेल्या 142 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बेंगलोरने 6 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 137 धावाच करू शकला. केन विल्यम्सनच्या नेतृत्वातील सनरायझर्सचा यंदाच्या आयपीएलमधील (IPL) 13 सामन्यातील हा तिसरा विजय ठरला आहे. दुसरीकडे, विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सना 13 सामन्यात पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अंतिम ओव्हरमध्ये बेंगलोरला विजयासाठी 13 धावांची गरज होती आणि संघाचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलिअर्स (AB de Villiers) खेळत होते. पण भारतीय गोलंदाजाने आपला अनुभव कामी आणत आरसीबीच्या तोंडून विजयाचा घास खेचून आणला. बेंगलोरसाठी पडिक्क्लने सर्वाधिक 41 धावा केल्या. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलने 40 धावांचे योगदान दिले. तर डिव्हिलिअर्स 19 धावा करून नाबाद परतला. तसेच हैदराबादसाठी गोलंदाजांनी जोर लावून प्रयत्त्न केला आणि अखेरीस ते यशस्वी ठरले. सनरायझर्ससाठी भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, राशिद खान, जेसन होल्डर आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (IPL 2021: हर्षल पटेलची रेकॉर्ड-ब्रेक गोलंदाजी; बनला आयपीएलचा नंबर 1 भारतीय गोलंदाज, आता सर्वात मोठ्या विक्रमापासून 4 पाऊल दूर)

अबू धाबी येथे हैदराबादने दिलेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा झटका बसला. भुवनेश्वर कुमारने षटकच्या अंतिम चेंडूवर आरसीबी कर्णधार विराट कोहलीला 4 चेंडूत 5 धावांवर पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये 4 चेंडूत एक धाव करून खेळाच्या डॅन ख्रिस्चनला हैदराबादच्या कौलने अधिक वेळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. पॉवरप्लेमध्ये दोन विकेट गमावणाऱ्या बेंगलोरने सातव्या ओव्हरमध्ये काश्मीरचा युवा गोलंदाज उमरान मलिकने आरसीबीचा यष्टीरक्षक केएस भरतला बाद करून आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आणि बेंगलोरला तिसरा झटका दिला. त्यानंतर पडिक्क्लने अष्टपैलू मॅक्सवेलसह संघाचा डाव सावरला. दोघे आक्रमक खेळ करत असताना अतिरिक्त धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मॅक्सवेलने हैदराबाद कर्णधार मॅक्सवेलने रनआऊट करून संघाला मोठा दिलासा दिला. निर्णायक क्षणी आरसीबीने पडिक्क्ल आणि शाहबाज अहमदची विकेट गमावली. पण अंतिम वेळी डिव्हिलिअर्स खेळपट्टीवर होता पण शेवटच्या षटकात 13 धावांची गरज असताना आरसीबी संघ केवळ 9 धावाच करु शकला. ज्यामुळे हैदराबाद 4 धावांनी विजयी झाला.

यापूर्वी आरसीबीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला जो गोलंदाजांनी सार्थक ठरवला. आरसीबी गोलंदाज नियमित अंतराने विकेट घेत राहिले ज्यामुळे हैदराबाद आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकली नाही. सनरायझर्ससाठी जेसन रॉयने 44 आणि विल्यम्सनने 31 धावा केल्या. तर दुसरीकडे, आरसीबीकडून हर्षल पटेलने 3 विकेट घेतल्या. तसेच ख्रिस्चनने 2 गडी बाद केले.