Ravindra Jadeja Injury Update: इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी रविंद्र जडेजा तंदुरुस्त नाही, टीम इंडियाला मोठा झटका
ज्यामुळे तो सामना अर्धवट सोडून टेस्ट सामन्यातून माघार घेतली होती. दुखापतीनंतर त्याला बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अॅकेडीमीत पाठविण्यात आले होते.
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत (India vs England 2021 Test Series ) पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाला (Team India) पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. भारताचा अष्ठपैलू फिरकी खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja Injury Update) या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. रविंद्र जडेजा ((Ravindra Jadeja) हा या मालिकेत खेळण्यासाठी पूर्ण तंदुरुस्त नाही. त्यामुळे त्याच्या संघातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. प्रसारमध्यांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की फिटनेस (तंदुरुस्त) नसल्याने टीम इंडियाला ही मालिका रविंद्र जडेजा याच्याशिवाय खेळावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट मालिकेच्या तीसऱ्या सामन्यात तिसऱ्या दिवशी जडेजा याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो सामना अर्धवट सोडून टेस्ट सामन्यातून माघार घेतली होती. दुखापतीनंतर त्याला बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अॅकेडीमीत पाठविण्यात आले होते. इथे डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. (हेही वाचा, ICC Test Rankings: इंग्लंडविरुद्ध पराभव भोवला; आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहलीची पाचव्या स्थानी घसरण तर, जो रूटला बढती)
जेव्हा इंग्लंड विरुद्ध सुरुवातीचे दोन सामने खेळण्याची घोषणा झाली होती तेव्हा अपेक्षा होती की तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यापर्यंत जडेजा तंदुरुस्त होईल. परंतू, आता तसे होताना दिसत नाही. आता जडेजा याच्या ऐवजी शाहबाज नदीम याला संघात स्थान देण्यात आले होते. तसेच, त्याला टेस्टमध्ये खेळण्याची संधीही मिळाली होती. परंतू, अपेक्षेप्रमाणे त्याची कामगिरी सरस ठरली नाही. मानले जात आहे की, अक्षरप पटेल चेन्नई येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये नदीम याच्या जागी टीम इंडियात सहभागी होईल.