IPL दरम्यान कुटुंबीय COVID-19 शी संघर्ष करताना Ravichandran Ashwin ची उडाली होती झोप, भारतीय फिरकीपटूने सांगितला भयानक अनुभव!

कुटुंबातील कोरोना प्रकरण समोर आल्यानंतर अश्विनने पाच सामन्यानंतर आयपीएलमधून माघार घेतली होती. त्या भयानक क्षणांचा परिणाम असा झाला की अश्विन सारख्या खेळाडूला देखील हा त्याच्या कारकिर्दीचा शेवट आहे का असे वाटू लागले.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 दरम्यान कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यावर आपली झोप उडाली होती असे भारताचा कसोटी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) म्हटले आहे. कुटुंबातील कोरोना प्रकरण समोर आल्यानंतर अश्विनने पाच सामन्यानंतर आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर काही सामन्यानंतर आयपीएलच्या (IPL) बायो-बबलमध्ये देखील कोविड-19 (COVID-19) चा शिरकाव झाल्यामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. अश्विनने यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “माझ्या कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. माझ्या काही चुलतभावांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ते गंभीर होते व ते आता काही प्रमाणात बरे झाले आहेत.” तो पुढे म्हणाला, “मला किमान आठ-नऊ दिवस झोप येत नव्हती. झोप न लागल्यामुळे मी खूप तणावात होतो. मी झोपेशिवाय सामना खेळायला गेलो होतो. त्यानंतर मी आयपीएलमधून माघार घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला.” (चेन्नईतील PSBB शाळेतील शिक्षकाकडून मुलींचे लैंगिक शोषणाच्या घटनेने Ravichandran Ashwin अस्वस्थ, पहा काय म्हणाला)

शिवाय, त्या भयानक क्षणांचा परिणाम असा झाला की अश्विन सारख्या खेळाडूला देखील हा त्याच्या कारकिर्दीचा शेवट आहे का असे वाटू लागले. अश्विन म्हणाला की तो आता खेळाकडे परत येईल की नाही याबद्दल त्याला विचार पडला होता. अश्विन म्हणाला, “जेव्हा मी आयपीएलमधून माघार घेतली, तेव्हा मी विचार करीत होतो की त्यानंतर मी क्रिकेट खेळू शकेल का?” तो आयपीएलमध्ये परत जाण्याचा विचार करत असताना आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्याचे स्पिनरने सांगितले. अहमदाबाद आणि नवी दिल्लीमध्ये आयपीएलच्या आठपैकी चार फ्रँचायझी मध्ये कोविड-19 संक्रमची खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रकरणे आढल्यानंतर 2 मे रोजी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आयपीएलमधील 29 सामन्यानंतर स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यानंतर आता बीसीसीआय स्पर्धेचा दुसरा टप्पा आयोजित करण्यासाठी धडपड करत आहे. भारतात कोविड-19 चा धोका लक्षात घेत स्पर्धा युएई येथे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात म्हणजे टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आयोजित करण्याची बीसीसीआय योजना आखत आहे. तथापि विदेशी खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकांमुळे त्यांच्या स्पर्धेत भाग घेण्याबाबत सस्पेंस कायम आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif