रवि शास्री यांची निवड करणाऱ्या CAC ला नोटीस, पुन्हा होणार भारताच्या प्रशिक्षक पदासाठी निवड?
त्यामुळे आता पुन्हा नव्या प्रशिक्षक पदासाठी निवडण करावी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्री (Ravi Shastri) यांची निवड केल्याप्रकरणी आता प्रश्न उपस्थित करण्यात आला असून सीएसी (CAC) समितीला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या प्रशिक्षक पदासाठी निवडण करावी लागणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. खरंतर बीसीसीआयच्या (BCCI) एथिक्स ऑफिसर डीके जैन यांनी शनिवारी कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीला हितसंबंधांवरून नोटिस पाठवली आहे.
सीएसी समितीमध्ये 1983 मधील वर्ल्डकप सामने खेळलेले माजी कर्णधार कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे. या सर्वांनी नुकताच रवि शास्री यांना पुन्हा भारताच्या प्रशिक्षकपदी निवड केली होती. त्याचसोबत रवि शास्त्री यांच्या प्रशिक्षकपादाचा कार्यकाल 2021 पर्यंत वाढवून दिला. सीएसीविरोधात हितसंबंध संघर्षाचे आरोप लावण्यात आले असून येत्या 10 ऑक्टोंबर पर्यंत या मुद्द्यावर उत्तर देण्यास वेळ दिली आहे.
आयएएनएस यांच्यासोबत बातचीत करताना बीसीसीआयच्या एका बोर्ड अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, जर सीएसी मधील कोणीही या प्रकरणी दोषी आढळल्यास तर रवि शास्री यांच्या प्रशिक्षक पदाच्या नियुक्तीवर पुन्हा विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे परत एकदा प्रशिक्षक पदासाठी निवड प्रक्रिया करावी लागण्याची शक्यता भासल्यास ती बीसीसीआयसाठी एक गंभीर बाब ठरणार आहे.बीसीसीआयच्या संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप सीएसीच्या सदस्यांवर करण्यात आला आहे. (एमएस धोनी च्या टीम इंडियामधून अनुपस्थितीवर गौतम गंभीर ने केले 'हे' विधान, निवड समितीलाही दिला 'हा' सल्ला)
काय आहे नेमक प्रकरण?
मध्य प्रदेशातील क्रिकेट संघाच्या आजीवन सदस्य संजीव गु्प्ता यांनी या तीन जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सीएसी समितीने ऑगस्ट महिन्यात रवि शास्री यांना भारताचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून पुन्हा निवडले होते. बीसीसीआय अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, या तिघांना दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचे उत्तर प्रतिज्ञापत्रासह देण्यास सांगितले आहे. बीसीसीआयच्या संविधानानुसार कोणत्या सदस्याला क्रिकेटसंदर्भात कोणतीही भुमिका पार पाडू शकत नाही.
गुप्ता यांनी त्यांच्या तक्रारीत असे म्हटले आहे की, सीएसी सदस्य एकसाथ अन्य भुमिका बजावत आहेत. तर कपिल देव हे सीएसी सदस्य यांच्या व्यतिरिक्त कॉमेंटिटरस आणि एक फ्लडलाइट कंपनीचे मालकासह भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य सुद्धा आहेत.
भारताच्या माजी महिला कर्णधार रंगास्वामी यांनी सीएसीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.तसेच 'आयसीए'च्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सीएसीने डिसेंबरमध्ये महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकांची निवड केली होती.